World Cup : दक्षिण अफ्रिका पाकिस्तान सामन्यातील तो निर्णय हरभजनला खटकला, थेट आयसीसीकडे मागितली दाद
World Cup 2023, PAK vs SA : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं काही खरं नाही. सलग चार सामने गमवल्याने पुढची वाट आणखी बिकट झाली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विजय हातातोंडाशी आला असताना गमवावा लागला. त्याला पंच कारणीभूत ठरले आणि मोठा फटका बसला.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 26 वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पार पडला. उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला या सामन्यातील विजय महत्त्वाचा होता. पण दक्षिण अफ्रिकेने हा सामना 1 गडी आणि 16 चेंडू राखून जिंकला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 46.4 षटकात सर्व गडी बाद 270 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा डाव अडखळला. शेवटच्या टप्प्यात तर हा सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या हातात आला होता. पण खराब पंचगिरीचा फटका पाकिस्तानला बसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यानेही पाकिस्तानच्या पराभवाला पंचांना जबाबदार धरलं आहे. इतकंच काय तर सामना संपल्यानंतर खराब पंचगिरीकसाठी आयसीसीला टॅग करत ट्वीट केलं आहे. खराब पंचगिरीमुळे पाकिस्तानला सामना गमवावा लागल्याचं त्याने सांगितलं आहे.
दक्षिण अफ्रिकेला एक गडी उरला असताना 8 धावांची आवश्यकता होती. हारिस रौफने षटकातील शेवटचा चेंडू टाकला आणि थेट त्याच्या पायावर आदळला. जोरदार अपील केलं आणि पंचांनी नाबाद घोषित केलं. त्यामुळे डीआरएस घेण्यात आला. तंत्रज्ञानाच्या आधारे पाहिलं तर चेंडू स्टम्पवर काही अंशी आदळत होता. पण तिसऱ्या पंचांनी फिल्डवरील पंचांना निर्णय कायम ठेवला आणि नाबाद असल्याचं सांगितलं. ती विकेट जर मिळाली असती तर पाकिस्तानने हा सामना 8 धावांनी जिंकला असता.
Bad umpiring and bad rules cost Pakistan this game.. @ICC should change this rule .. if the ball is hitting the stump that’s out whether umpire gave out or not out doesn’t matter.. otherwise what is the use of technology??? @TheRealPCB vs #SouthAfrica #worldcup #PAKvsSA #SAvsPAK pic.twitter.com/CmiIWigaiu
— M.Z.A👑 (@Muhamma15874875) October 27, 2023
काय म्हणाला हरजभज सिंग?
“खराब पंचगिरी आणि नियमांमुळे पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. हा नियम बदलायला हवा. जर चेंडू स्टंपला लागत असेल तर फलंदाज आऊट आहे. मग फिल्डवरचा अंपायर आउट देवो की नको. तंत्रज्ञानाद्वारे याचा निर्णय घेतला जात नसेल तर त्याचा काय फायदा.”, असं हरभजन सिंह म्हणाला.
Bad umpiring and bad rules cost Pakistan this game.. @ICC should change this rule .. if the ball is hitting the stump that’s out whether umpire gave out or not out doesn’t matter.. otherwise what is the use of technology??? @TheRealPCB vs #SouthAfrica #worldcup
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 27, 2023
“आज कोण जिंकलं किंवा हरलं याने काहीही फरक पडत नाही. कोण सामना खेळत आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. पण हा नियम योग्य नाही. उद्या हे आमच्यासोबतही होऊ शकतो. अशा पंचगिरीमुळे आम्ही अंतिम सामना गमवला तर काय होईल?”, असंही हरभजन सिंग पुढे म्हणाला.
