जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात तयार होतंय..!

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम होणार आहे. सध्या या मैदानाचं काम सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील जगातलं सर्वात मोठं स्टेडियम मेलबर्नलाही मोटेरा स्टेडियम मागे टाकणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या मैदानाचं काम पूर्ण झाल्यानंतर हे संपूर्ण देशासाठी अभिमानाचं प्रतिक असेल, असं जीसीएचे उपाध्यक्ष पिरामल नाथवानी यांनी …

जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात तयार होतंय..!

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम होणार आहे. सध्या या मैदानाचं काम सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील जगातलं सर्वात मोठं स्टेडियम मेलबर्नलाही मोटेरा स्टेडियम मागे टाकणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या मैदानाचं काम पूर्ण झाल्यानंतर हे संपूर्ण देशासाठी अभिमानाचं प्रतिक असेल, असं जीसीएचे उपाध्यक्ष पिरामल नाथवानी यांनी म्हटलंय.

मोटेरा स्टेडियमवर डिसेंबर 2011 पर्यंत 23 वन डे सामने खेळवण्यात आले आहेत. या मैदानाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. हे मैदान अनेक ऐतिहासिक सामन्यांचंही साक्षीदार आहे. लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी 10 हजार धावांचा टप्पा याच मैदानावर गाठला होता. शिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कसोटीतलं पहिलं द्विशतक याच मैदानावर ठोकलं होतं.

1982 साली बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमची क्षमता 49 हजार प्रेक्षकांची होती. इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याने या मैदानाची सुरुवात झाली होती.

जगभरात सध्या विविध प्रकारची मैदानं आहेत. त्यात सर्वात मोठं क्रिकेट मैदान म्हणून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची ओळख आहे. या मैदानाची क्षमता सध्या 90 हजार प्रेक्षकांची आहे. तर भारतातलं कोलकात्याचं ईडन गार्डनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मैदानाची क्षमता 66 हजार प्रेक्षकांची आहे.

दरम्यान, मोटेरा स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या तीन मैदानांमध्ये भारतीय मैदानांचाच समावेश असेल. कारण, मोटेरा स्टेडियम पहिल्या क्रमांकावर असलेल्या मेलबर्न मैदानाची जागा घेईल. दुसऱ्या क्रमांकावर ईडन गार्डन आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियम आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *