Video | श्रीलंका लेजेंड्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहचे 4 खणखणीत सिक्स, पाहा व्हिडीओ

| Updated on: Mar 22, 2021 | 2:01 PM

युवराज सिंहने (Yuvraj Singh Hit 4 Sixes) श्रीलंका लेजेंड्स विरुद्धच्या (sri lanka legends) अंतिम सामन्यात 60 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 अफलातून सिक्स खेचले.

Video | श्रीलंका लेजेंड्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात सिक्सर किंग युवराज सिंहचे 4 खणखणीत सिक्स, पाहा व्हिडीओ
युवराज सिंहने (Yuvraj Singh Hit 4 Sixes) श्रीलंका लेजेंड्स विरुद्धच्या (sri lanka legends) अंतिम सामन्यात 60 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 अफलातून सिक्स खेचले.
Follow us on

रायपूर : इंडिया लेजेंड्सने ( India legends) श्रीलंका लेंजेड्सचा (Sri Lanka legends) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी20 च्या अंतिम सामन्यात 14 धावांनी पराभव केला. यासह सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात इंडिया लेजेंड्सने विजेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा चोपल्या. यामुळे श्रीलंकेला विजयसाठी 182 धावांचे आव्हान मिळाले. मात्र श्रीलंकेला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या. यासह इंडिया लेजेंड्सने विजेतेपद पटकावलं. टीम इंडियाकडून युसूफ पठाणने (Yusuf Pathan) सर्वाधिक नाबाद 62 धावांची खेळी केली. पण चर्चेत राहिला तो सिक्सर किंग (Yuvraj Singh) युवराज सिंह. युवराजने या सामन्यात एकूण 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यामध्ये युवराजने खणखणीत 4 सिक्स खेचले. (yuvraj singh hit 4 sixes against sri lanka legends in final match)

युवराज आणि युसूफची भागीदारी

युवराज आणि युसूफ पठाण या दोघांनी बॅटिंग करताना चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. या दरम्यान या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतला. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दरम्यान युवराजने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लेजेंड्सने श्रीलंकेला 182 धावांचे आव्हान दिले. युसूफने 5 सिक्स आणि 4 सिक्ससह 62 धावा केल्या.

श्रीलंकेवर 14 धावांनी विजय

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या श्रीलंका लेजेंड्सची झोकात सुरुवात झाली. तिल्करत्ने दिलशान आणि सनथ जयसूर्याने 62 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र यानंतर इंडिया लेजेंड्सच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना बाद केलं. त्यानंतरही श्रींलेकेने सामन्यातील आव्हान कायम राखले होते. मात्र निर्णायक क्षणी युसूफ आणि इरफान पठाणने विकेट्स घेत सामना आपल्या बाजूने झुकवला. अशा प्रकारे इंडिया लेजेंड्सने श्रीलंक लेजेंड्सचा 14 धावांनी पराभूत केलं.

युवराजचा कारनामा

दरम्यान युवराजने या स्पर्धेत आपल्याला सिक्सर किंग का म्हणतात, हे दाखवून दिलं. युवराजने साखळी फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध 4 चेंडूत 4 षटकार खेचले होते. तर त्यानंतर 4 चेंडूत 4 षटकार खेचले होते. तर यानंतर वेस्टइंडिज लेजेंड्स विरुद्धच्या सेमी फायनल मॅचमध्येही युवराजने अफलातून 4 बोलमध्ये 4 शानदार सिक्स चोपले होते.

संबंधित बातम्या :

PHOTO | रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी 20 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पठाण बंधूंची विजयी कामगिरी

Road Safety World Series | वीरेंद्र सेहवागचा झंझावात, 28 चौकार आणि 7 षटकारांसह 139 चेंडूत चोपल्या 214 धावा

Video : सिंग इज किंग… युवराजची बॅट पुन्हा तळपली, एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार, पाहा व्हिडीओ…

(yuvraj singh hit 4 sixes against sri lanka legends in final match)