Xiaomi Redmi Note 7 Pro : 48 मेगापिक्सेल कॅमेरा, किंमत फक्त...

मुंबई : शाओमीने आणखी एक जबरदस्त फोन लाँच केलाय. 48 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा असलेला Xiaomi Redmi Note 7 Pro हा फोन केवळ 15 हजार रुपयांच्या आत उपलब्ध आहे. सर्वात अगोदर हा फोन भारतात लाँच झालाय. Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro हे दोन फोन दिल्लीतल्या एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले. …

Xiaomi Redmi Note 7 Pro : 48 मेगापिक्सेल कॅमेरा, किंमत फक्त...

मुंबई : शाओमीने आणखी एक जबरदस्त फोन लाँच केलाय. 48 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा असलेला Xiaomi Redmi Note 7 Pro हा फोन केवळ 15 हजार रुपयांच्या आत उपलब्ध आहे. सर्वात अगोदर हा फोन भारतात लाँच झालाय. Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro हे दोन फोन दिल्लीतल्या एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले. नोट सीरिजच्या अगोदरच्या फोनलाही ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली होती. यामध्ये आणखी अपग्रेडेशनसह आता हे फोन लाँच करण्यात आलेत. यापूर्वीच्या Redmi Note 6 Pro मध्ये 4K रेकॉर्डिंग हे फीचर नव्हतं, जे Redmi Note 7 Pro मध्ये देण्यात आलंय.

Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro ची किंमत

शाओमीने Redmi Note 7 Pro ची किंमत 13999 रुपये ठेवली आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनच्या दुसऱ्या मॉडेलची किंमत 16999 रुपये आहे. 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजचं हे व्हेरिएंट आहे. हा फोन 13 मार्चपासून खरेदी करता येईल. नेपच्यून ब्ल्यू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक या तीन कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन विक्रीसाठी एमआयडॉट कॉम, फ्लिपकार्ट आणि एमआय स्टोअरवर उपलब्ध असेल. फोनच्या विक्रीसाठी एअरटेलसोबतही करार करण्यात आलाय, ज्याअंतर्गत 1120GB पर्यंतचा 4G डेटा दिला जाईल. रेडमी नोट 7 ची विक्री 6 मार्चपासून सुरु होईल. या फोनची किंमत 9999 रुपये आहे.

Redmi Note 7 Pro चे फीचर्स

MIUI 10 सिस्टम

6.3 इंच आकाराची फुल एचडी स्क्रीन

ऑक्टा कोअर क्वालकॉम 675 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB इंटर्नल स्टोरेज

48 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, एआय मोड, नाईट मोड, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग

13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

4,000mAh

Bluetooth 5.0

Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro यांच्यातील फरक काय?

दोन्ही फोनमध्ये सर्वात मोठं अंतर म्हणजे Note 7 Pro हा Note 7 च्या तुलनेत जास्त पॉवरफुल आहे. त्यामुळेच Note 7 Pro ची किंमतही जास्त आहे. Note 7 Pro मध्ये 8 Kryo 460 कोअर, 2 ARM Cortex-A76 आणि 6 ARM Cortex-A55 कोअरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर देण्यात आलंय. स्नॅपड्रॅगन 675 सर्वात दमदार प्रोसेसर असल्याचा शाओमीचा दावा आहे.

आणखी विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर असणारा हा 20 हजार रुपये किंमतीच्या आतला पहिलाच फोन आहे. Note 7 मध्ये 2.2GHz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 660 AIE प्रोसेसर देण्यात आलंय. Note 7 हा देखील 10 हजार रुपयांच्या आतला पहिलाच फोन आहे, ज्यात 660 प्रोसेसर देण्यात आलंय.

कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. शिवाय दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Note 7 Pro हा शाओमीचा पहिला फोन आहे, ज्यात 48 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. Note 7 Pro मध्ये प्रायमरी कॅमेरा 48 आणि सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. तर Note 7 मध्ये 12+2 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर फ्रंटसाठी दोन्ही फोनमध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *