Micromax IN Note 1 आणि IN 1b स्मार्टफोनसाठी 10 नोव्हेंबरपासून बुकिंगला सुरुवात होणार

मायक्रोमॅक्सने नुकतेच Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Micromax IN Note 1 आणि IN 1b स्मार्टफोनसाठी 10 नोव्हेंबरपासून बुकिंगला सुरुवात होणार
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 10:16 PM

मुंबई : मायक्रोमॅक्सने (Micromax) नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. हे दोन्ही बजेट फोन ग्राहक उद्यापासून (10 नोव्हेंबरपासून) प्री-ऑर्डर करु शकतात. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल 2020 (Flipkart Big Diwali Sale 2020) मध्ये उपलब्ध होणार आहेत.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने Micromax In Note 1 डिव्हाईस दोन व्हेरिअंटमध्ये सादर केले आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

Micromax In 1B हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामधील 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Micromax In Note 1 चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.

Micromax In 1B चे स्पेसिफिकेशन्स

Micromax In 1B मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Diwali Sale : Realme 6 वर बंपर डिस्काऊंट, अवघ्या 9,999 रुपयांमध्ये खरेदी करा जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन!

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

(Flipkart Big Diwali Sale 2020 : Micromax in note 1 and in 1b pre orders start on november 10)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....