बापरे! Google Photos मध्ये फोटो साठवून ठेवण्यासाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक अधिकृत मेल पाठवला आहे,

बापरे! Google Photos मध्ये फोटो साठवून ठेवण्यासाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 5:45 PM

कॅलिफोर्निया : गुगल अकाऊंट वापरणाऱ्या युजर्ससाठी 1 जून 2021 पासून सर्व नियम बदलले जाणार आहेत. गुगलने नुकते जाहीर केले आहे की, गुगल फोटोची सुविधा आता मोफत दिली जाणार नाही. आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक मेलदेखील पाठवला आहे, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही गुगल फोटोज (Google Photos) अॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील. (Google One subscription plans are announced; check how much you pay and what you get)

जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच सांगितलं आहे.

मेलमध्ये पुढे नमूद केलं आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक गुगल अकाऊंटला 15 जीबी स्टोरेज स्पेस मोफत दिली जाते. यामध्ये तुमचा Gmail डेटा, गुगल ड्राईव्हवरील डेटा आणि अँड्रॉयड स्मार्टफोनमधील फोटोंच्या बॅकअपचा समावेश असतो. हे सर्व फोटो ओरिजनल हाय क्वालिटीमध्ये सेव्ह केलेले असतात. दरम्यान गुगलने अद्याप गुगल डॉक्स, शीट्स, स्लाइड्स, ड्रॉइंगि्स आणि इतर गोष्टींचा 15 जीबी स्टोरेजच्या नियमांमध्ये समावेश केलेला नाही. कोणतेही युजर गुगल क्लऊड स्टोरेजमध्ये कोणतेही फोटो, व्हिडीओ कोणत्याही क्वालिटीत अपलोड करतील तर ते 15 जीबी स्टोरेजचा हिस्सा असतील, सध्या ही सेवा मोफत दिली जात आहे.

यामध्ये युजर्ससाठी आनंदाची बाब ही आहे की, जर तुम्ही 1 जून 2021 पूर्वी फोटो अपलोड करुन ठेवले असतील, तर ते फोटो मर्यादित 15 जीबी स्टोरेजचा भाग नसतील. त्यानंतर अपलोड केल्या जाणाऱ्या फोटोज आणि व्हिडीओजसाठी तुम्हाला गुगलला पैसे द्यावे लागतील.

तुम्ही 15 जीबी मोफत डेटा वापरल्यानंतर 100 जीबी ते 2 टीबीपर्यंत स्टोरेज स्पेस विकत घेऊ शकता. यामध्ये 100 जीबी स्टोरेज स्पेससाठी तुम्हाला 1300 रुपये मोजावे लागतील. 200 जीबी स्टोरेज स्पेससाठी 2100 रुपये तर 2 टीबी स्टोरेज स्पेससाठी 6500 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, कंपनी त्यांच्या पेड सर्व्हिसेसना वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी Google One द्वारे पेड सर्व्हिसेस पुरवत आहे.

स्टोरेज क्षमतेची माहिती दिली जाणार

कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, आम्ही हा निर्णय विचार करुन घेतला आहे. हा एक मोठा बदल आहे. परंतु असे बदल करत असताना आम्ही तुम्हालाही यात सामील करुन घेत आहोत. आम्ही तुमच्या मदतीसाठी एक नवं टूल जनरेट करत आहोत. या टूलद्वारे तुम्हाला माहिती मिळत राहील की, तुम्ही किती स्टोरेज स्पेस वापरली आहे. हे टूल तुम्हाला तुमचे फोटोज, व्हिडीओ आणि अन्य कॉन्टेंटच्या बॅकअपच्या हिशेबाने माहिती देत राहील.

गुगलची नवी पॉलिसी; मेल, फोटो, व्हिडिओ डिलीट होणार

सतत अपडेट असलेल्या गुगलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी (Google Might Delete Your All Content ) आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेले अकाऊंट्स डिलीट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाही. त्यांचे जीमेल आणि गुगल ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत

गूगल वन सर्व्हिस

Google One कंपनीचा पेड मेंबरशीप प्लॅन आहे. याचा वापर तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी तसेच, फोन बॅकअपसाठी करु शकता. त्याशिवाय, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गूगल एक्सपर्ट्स आणि फॅमिली शेअरिंगचा एक्सेस देखील मिळतो. नुकतीच गूगलने VPN सुविधा सुरु केली आहे. त्याशिवाय, कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गूगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

तुमच्या फोनमधून ‘हे’ अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील

Google | गुगलच्या ग्राहकांनो, ‘हे’ काम कराच; नाही तर मेल, फोटो, व्हिडिओ होणार डिलीट

WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

(Google One subscription plans are announced; check how much you pay and what you get)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.