भाळी लिहिले ते कोण पुसणार? 100 कोटींचा पगार, Elon Musk ने झटक्यात दाखवला बाहेरचा रस्ता, आज त्याने करुन दाखवली कमाल

Startup : Twitter आताचे X, दोन वर्षांपूर्वी एलॉन मस्कने ताब्यात घेतले आणि जो काय राडा घातला म्हणता की या कंपनीचे कर्मचारीच नाही तर जग अवाक झालं. त्याच्या विचित्र निर्णयामुळे अनेकांना त्रास झाला. ट्विटरचा कारभार पाहणाऱ्या एका भारतीयाला त्याने तडकाफडकी बाहेर काढले, आज त्याचे नशीब फळफळले आहे.

भाळी लिहिले ते कोण पुसणार? 100 कोटींचा पगार, Elon Musk ने झटक्यात दाखवला बाहेरचा रस्ता, आज त्याने करुन दाखवली कमाल
या भारतीयानं करुन दाखवलं
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 4:40 PM

भारतीय तरुण अमेरिका ते जर्मनीपर्यंत कमाल करत आहेत. जगातील बड्या कंपन्यांची जबाबदारी, कमान त्यांच्या खांद्यावर आहे. मोठं-मोठ्या टेक कंपन्यांमध्ये तर भारतीयांचा बोलबाला आहे. काही वर्षांपूर्वी ट्विटर या कंपनीचा कमान एका भारतीयाच्या हाती होती. त्याचे वेतन 100 कोटी रुपये होते. ही कंपनी एलॉन मस्क या जागतिक धनाढ्याने ताब्यात घेतली आणि त्याच्या उलटसूलट निर्णयाने कंपनीतील कर्मचारीच नाही तर जग अवाक झालं. त्यात त्याने या भारतीयाला बाहेरचा रस्ता दाखवला. अर्थात त्याने हार मानली नाही. त्याने एलॉन मस्कला त्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध करुन दाखवले.

मस्क याने ट्विटर घेतले ताब्यात

तर एलॉन मस्क याने ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटर 44 अब्ज डॉलरला खरेदी केले. ट्विटर खरेदी केल्याने त्याने इतके विचित्र निर्णय घेतले की त्याची हेटाळणी झाली. त्याला अनेकांनी वेड्यात काढले. अनेक कार्यालये, त्यातील खुर्ची, टेबल याचा त्याने लिलाव केला. अनेक कर्मचाऱ्यांना त्याने नोकरीवरुन कमी केले. तर एका ऑनलाईन बैठकीत कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला. त्याने ट्विटरचा लोगो, त्याचे नाव बदलले. त्याचे हे प्रयोग अजूनही संपलेले नाही. त्यावेळी ट्विटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या पराग अग्रवाल यांना सुद्धा त्याने बाहेरचा रस्ता दाखवला.

हे सुद्धा वाचा

का केले होते नोकरीवरुन कमी?

पराग अग्रवाल आयआयटी पदवीधर आहेत. ट्विटरचे सीईओ म्हणून ते अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यावेळी त्यांचे वेतन 100 कोटींच्या घरात होते. मस्क याने त्याचे खासगी जेट याचे लोकेशन ट्रॅक करणारे अकाऊंट ब्लॉक करण्यास सांगितले होते. अग्रवाल यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर लागलीच मस्क याने ट्विटर अधिग्रहण केले. अग्रवाल यांचा रागात त्याच्या मनात होता, मस्क याने येताच अग्रवाल यांचा पत्ता कट केला. याविषयीची हकीकत ब्लूमबर्गच्या कुर्ट वॅगनर यांच्या पुस्तकात देण्यात आलेली आहे.

अग्रवाल जवळपास 400 कोटी रुपयांसाठी पात्र होते. पण मस्क यांनी त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे पराग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकाराविरोधात लवादाकडे दाद मागितली आहे. त्यांनी एक हजारांचा दावा ठोकला आहे.

पराग अग्रवाल यांनी केली कमाल

या सर्व घटनेनंतर अग्रवाल हे AI क्षेत्रात उतरले. त्यांनी एक नवीन स्टार्टअप सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी 249 कोटी रुपयांचे फंडिंग पण मिळवले आहे. बहुभाषिक मॉडेलवर आधारीत एक सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम ते करत आहेत. ओपनआयमधील चॅटजीपीटीसारखं हे तंत्रज्ञान आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.