Google Pixel 3a आणि 3a XL वर 13000 रुपयांची सूट

Google Pixel 3a आणि 3a XL वर 13000 रुपयांची सूट

मुंबई : बाजारात सध्या अनेक मोबाईल कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फीचर असेलेले स्मार्टफोन लाँच करत आहे. यासोबतच काही कंपन्या हटके ऑफर देत आपला फोन बाजारात उतरवतात. गुगल पिक्सलनेही आपल्या दोन फोनवर भरघोस सूट दीली आहे. गुगलने गेल्या महिन्यात Pixel 3a  आणि Pixel 3a XL स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनवर तब्बल 13 हजारांची सूट मिळत आहे.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये फक्त सिंगल प्रायमरी रिअर कॅमेरा आहे, याशिवाय यामध्ये हाय-रेजोल्यूशनचे फोटो घेता येतात.

गुगल पिक्सल 3a आणि पिक्सल 3a XL वर डिस्काऊंट ऑफर्स

कंपनीने गुगल पिक्सल 3a भारतीय बाजारात 39 हजार 999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. फ्लिपकार्ट सेलवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काऊंट दिला जात आहे.

पिक्सल 3a XL 44 हजार 990 रुपयात लाँच केला होता. या फोनवरही एचडीएफसी बँके 10 टक्के सूट देत आहे. या डिस्काऊंटनंतर हा फोन तुम्ही 40 हजार 999 रुपयात खरेदी  करु शकता. तसेच या दोन्ही फोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. हा फोन खरेदी करताना सॅमसंग गॅलेक्सी एस 8 एक्सचेंज केला तर ग्राहकांना 13 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. यानंतर तुम्हाला हा फोन 27 हजार 999 रुपयात पडणार आहे.

जर तुम्ही एचडीएफसी बँकच्या इन्स्टंट डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर या दोघांचा लाभ घेतला तर गुगल पिक्सल 3a ला 24 हजार 389 रुपये आणि 3a XL 28 हजार 999 रुपयात खेरदी करु शकता.

गुगल पिक्सल 3a फीचर

 • 6 इंचाचा OLED डिस्प्ले
 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज
 • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर
 • 2 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा
 • 3,000 mAh बॅटरी
 • लेटेस्ट अँड्रॉईड 0 पाय ऑपरेटिंग सिस्टम

गुगल पिक्सल 3a XL फीचर

 • 0 इंचाचा OLED डिस्प्ले
 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज
 • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर
 • 2 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
 • अँड्रॉआड 0 पाय ऑपरेटिंग सिस्टिम
 • 3,700 mAh बॅटरी

Published On - 10:27 pm, Wed, 5 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI