AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनप्लसच्या पाठोपाठ आता रियलमी आणि पोकोचे ‘हे’ फोन झाले महाग, तुम्हाला मोजावे लागतील इतके रूपये

स्मार्टफोनच्या किमती सातत्याने वाढत आहेत. वनप्लसच्या पाठोपाठ रियलमी 16 सिरीज, पोको एक्स8 प्रो मॅक्स, पोको एम8 5जी आणि लावा अग्नी 4 यांसारख्या मॉडेल्सच्या किमतीही वाढल्या आहेत. आता ग्राहकांना हे फोन खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घेऊयात

वनप्लसच्या पाठोपाठ आता रियलमी आणि पोकोचे 'हे' फोन झाले महाग, तुम्हाला मोजावे लागतील इतके रूपये
OnePlus 15R
| Edited By: | Updated on: May 21, 2026 | 1:56 PM
Share

स्मार्टफोनच्या किमती वाढतच आहेत. OnePlus 15R च्या दरवाढीनंतर Realme, Poco आणि Lava चे हे फोन मॉडल्स महाग झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Realme कंपनीने 16 सिरीजमध्ये लाँच केलेल्या Realme 16, Realme 16 Pro आणि Realme 16 Pro Plus च्या किमतीही वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, Poco X8 Pro Max, Poco M8 5G आणि Lava Agni 4 हे फोन्स खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. चला तर मग आजच्या लेखात आपण किती रूपयांनी फोन्सच्या किमती वाढलेल्या आहेत ते जाणून घेऊयात.

भारतात Realme 16 ची किंमत

या हँडसेटचा 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 31 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता दरवाढीनंतर हा फोन तुम्हाला 33 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर यामध्ये 2 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

भारतात Realme 16 Pro Plus 5G ची किंमत

8GB रॅम आणि 256GB रॅम असलेला प्रो प्लस व्हेरिएंट 41 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. आता, किंमतवाढीनंतर हा फोन 48 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. प्रो प्लस व्हेरिएंटच्या किंमतीत तब्बल 7 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

भारतात Realme 16 Pro ची किंमत

8GB रॅम आणि 128GB रॅम असलेला प्रो व्हेरिएंट मूळतः 31 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता हाच फोन 36 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या किंमतीत 5 हजार रूपयांनी वाढली आहे.

भारतात Poco X8 Pro Max ची किंमत

हा पोको फोन आता अधिक महाग होणार आहे. 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट असलेला फोन 42 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र आता याच व्हेरिएंटची किंमत 44 हजार 999 रूपये इतकी झाली आहे. म्हणजेच खरेदी करताना हा फोन 2,000 ने महाग पडेल.

भारतात Poco M8 5G ची किंमत

या हँडसेटचा 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 18 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता हा व्हेरिएंट 2 हजाराने महाग झाला आहे. दरवाढीनंतर तुम्हाला हा फोन 20 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येईल.

भारतात Lava Agni 4 ची किंमत

लावा कंपनीच्या या मिड-रेंज फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच 24 हजार 999 रुपयांना लाँच झालेला हा फोन आता तुम्हाला 29 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल.

Follow Us
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय