फेसबुस युजर सावधान, दुसऱ्याचा फोटो वा व्हिडीओ शेअर केल्यास होऊ शकते नुकसान
मेटाने आतापर्यंत मोठ्या कंटेंट क्रिएटर्सची नक्कल करणाऱ्या सुमारे एक कोटी बनावट प्रोफाईलना काढून टाकल्या आहेत. याशिवाय, त्यांनी स्पॅम तसेच फसवणूकीत सहभागी असलेल्या सुमारे ५ लाख खात्यांवर कारवाई केली आहे.

युट्युबनंतर आता मेटाने देखील आता फेसबुकवर वारंवार दुसऱ्यांचा कंटेन्ट शेअर करणाऱ्या खात्यांविरोधात कठोर धोरण आरंभण्याची घोषणा केली आहे. मेटा कंपनीने म्हटले आहे की जी खाती वारंवार आपल्या खात्यावरुन कोणा दुसऱ्याचा टेक्स्ट, फोटो आणि व्हिडीओ फॉरर्वड वा शेअर करतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाणार आहे.
YouTube के बाद अब Meta
Meta ने सांगितले आहे त्यांनी आतापर्यंत सुमारे एक कोटी फेक प्रोफाईल्स हटवली आहेत, जी मोठ्या कंटेन्ट क्रिएटर्सची नक्कल करीत होती.तसेच मेटाने अशा ५ लाख खात्यांविरोधात एक्शन घेतली आहे जी स्पॅम वा फर्जी एंगजमेंटममध्ये सामील होती. या कारवाईत अशा खात्यांच्या कमेंट्स डिमोट करणे आणि कंटेन्टचा रिच मर्यादित करणे आदीचा समावेश आहे.
नवीन पॉलीसी काय ?
Meta ने म्हटले आहे की ते अशा युजरना टार्गेट करणार नाहीत ते कोणाचा कटेन्टवर रिएक्शन व्हिडीओ बनवतात. ट्रेंड्समध्ये भाग घेतात. वा आपली प्रतिक्रीया देतात. मेटाचा असली निशाणा त्या खात्यांवर असणार आहे जे जाणून बुझून दुसऱ्यांच्या कटेन्टची कॉपी करुन शेअर करीत आहेत. मग ती प्रोफाईल स्पॅम असो वा नकली क्रिएटर अकाऊंट त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
अशा खात्यांचा मॉनिटायझेशन देखील बंद केले जाऊ शकते.पोस्ट्सची रिच घटवली जाईल आणि त्यांना फेसबुकच्या शिफारसींशी हटवले जाईल. मेटा आता डुप्लिकेट व्हिडीओना ओळखून त्याचा वितरणही कमी करेल. त्यामुळे त्याच्या मुळ क्रिएटरला क्रेडिट आणि व्यूज मिळेल.
AI ने बनवलेल्या व्हिडीओवर देखील नजर
मेटाने थेट एआय स्लोपचा (AI-generated low-quality videos) उल्लेख केलेला नाही. परंतू त्याच्या ‘original content’च्या साठी दिलेल्या सल्ल्यावर स्पष्ट सांगितले गेले आहे की केवळ क्लिप्स जोडून वा वॉटरमार्क लावून कटेन्ट बनवू नका, ऑथेंटिक स्टोरीटेलिंगवर लक्ष द्या आणि असे व्हिडीओ बनवू नका ज्यात कोणतीही स्पष्ट व्हॅल्यू नसेल म्हणजे एआयने बनवलेले रिपिटेटीव्ह व्हिडीओ देखील मेटाच्या रडावर आले आहेत.
क्रिएटर्सना काय करायला हवे ?
Meta म्हटले आहे की हे बदल हळूहळू लागू होणार आहेत.ज्यामुळे क्रिएटर्सजवळ स्वत:ला एडजस्ट करायला वेळ मिळेल. क्रिएटर्सना जर जाणून घ्यायचे असेल की त्यांचा कंटेन्ट का कमी व्हायरल होत आहे, ते फेसबुकच्या Professional Dashboard वर जाऊन नवीन पोस्ट – लेव्हल इनसाईट्स पाहू शकता. तसेच क्रिएटर्सना Support सेक्शनमध्ये दिसेल की ते कोणाच्या शिक्षेच्या धोक्यात तर नाही ना. उदा.मॉनिटायझेशन बंद होणे वा रेकमेंडेशनपासून दूर हटने.
Meta ला का उचलावे लागले पाऊल
एआयच्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नकली, रिपेटेट गेलेला आणि कमी गुणवत्तेचा कंटेन्ट वेगाने वाढत आहे. युट्युबने आधीच या संदर्भात कठोर कारवाई सुरु केलेली आहे. आता मेटाने देखील त्याच्या प्लॅटफॉर्मची गुणवत्ता राखण्यासाठी असे करत आहे.
Meta चे हे पाऊल कंटेन्ट क्रिएटर्सना सावध केले असून जर ते केवळ कॉपी-पेस्ट वा रिपीटेड AI कंटेन्ट शेयर करत असतील तर त्यांना फेसबुकच्यावतीने शिक्षा भोगावी लागू शकते. जर सोशल मीडियावर टीकून राहायचे असेल तर ऑथेंटिक आणि व्हॅल्यू देणारा कटेन्ट बनवणे हाच एकमेव मार्ग उरला आहे.
