Airtel ची जबरदस्त ऑफर, नवीन WiFi कनेक्शन घेतल्यावर मिळेल 700 रूपयांची सूट
एअरटेलने आपल्या नवीन वापरकर्त्यांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. ज्यामध्ये क्रिकेट प्रेमींसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण नवीन वायफाय कनेक्शन खरेदी केल्यावर तुम्हाला 700 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्ही हा फायदा कसा आणि किती काळासाठी घेऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखातुन जाणून घेऊयात...

तुम्ही जर तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी नवीन वाय-फाय कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सुप्रसिद्ध टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. आता जर तुम्ही एअरटेलचे नवीन एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँड कनेक्शन घेतले तर तुम्हाला 700 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
ही ऑफर एअरटेलच्या क्रिकेट प्रमोशनल कॅम्पेनचा एक भाग आहे. आयपीएल 2025 ची क्रेझ वाढत असताना, एअरटेलने त्यांच्या प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी खास ऑफर लाँच केल्या आहेत. या खास ऑफरबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
एअरटेलची नवीन ऑफर काय आहे?
एअरटेलने सांगितले आहे की ही सवलत फक्त नवीन ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर कनेक्शन घेतले आणि ते ऑनलाइन बुक केले तर तुम्हाला त्यावर 700 रुपयांची सूट मिळू शकते.
सवलत कशी मिळवायची?
ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम एअरटेलच्या अधिकृत वेबसाइट किंवा एअरटेल थँक्स अॅपला भेट देऊन नवीन ब्रॉडबँड कनेक्शन बुक करावे लागेल. परंतु लक्षात ठेवा की ही सुविधा फक्त काही निवडक शहरांमध्येच दिली जाते. म्हणून प्रथम तुमच्या परिसरात ही सेवा उपलब्ध आहे की नाही ते जाणून घ्या.
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरची फिचर्स
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर 100 एमबीपीएस ते 1 जीबीपीएस पर्यंत जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट स्पीड देते. यामध्ये कंपनी तुम्हाला मोफत वाय-फाय राउटर आणि इन्स्टॉलेशन देते. कंपनीचे लोक तुमच्या घरी येतात आणि स्वतः राउटर बसवतात.
काही एअरटेल प्लॅनमध्ये Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Netflix सारख्या OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. एवढेच नाही तर त्यांची ग्राहक सेवा देखील खूप सक्रिय आहे. कंपनीची कस्टमर सपोर्ट सर्विस 24×7 सक्रिय आहे.
ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, ती 2025 च्या आयपीएल सीजन दरम्यान वैध असेल. म्हणून जर तुम्ही नवीन ब्रॉडबँड घेण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम संधी असू शकते.
