एअरटेलचा 199 रूपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या अधिक फायदे

एअरटेलचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन कमी डेटा वापरणाऱ्यांसाठी उत्तम आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे, त्यामुळे कमी किमतीत 28 दिवसांची वैधता शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. चला जाणून घेऊया की या प्लॅनमध्ये कोणते फायदे आहेत.

एअरटेलचा 199 रूपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या अधिक फायदे
airtel plan
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 28, 2026 | 5:21 PM

तुम्ही जर एअरटेल प्रीपेड सिम वापरत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतीमुळे त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या खिशाला पडत आहे.त्यामुळे प्रत्येकजण परवडणारे प्लॅन्स शोधत आहे. अशातच आज आम्ही 200 रूपयांपेक्षा कमी किमतीचा आणि 28 दिवसांच्या वैधतेचा एक उत्तम प्लॅन शोधला आहे. अशातच ज्यांना जास्त डेटा वापरण्याची गरज भासत नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. जरी यात कमी डेटा मिळत असला तरी, कमी किमतीत जास्त वैधतेचा प्लॅन शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला तर मग या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

एअरटेल 199 प्लॅनसोबत हे फायदे उपलब्ध

एअरटेलच्या 199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2 जीबी हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

एअरटेल 199 प्लॅनची ​​वैधता

हा एअरटेल रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही या प्लॅनमध्ये समाविष्ट असलेला 2 जीबी डेटा एकदम किंवा 28 दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने वापरू शकता.

199 प्लॅनचे अतिरिक्त फायदे

एअरटेल कंपनीच्या 200 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात, जसे की या प्लॅनसोबत तुम्हाला 4000 रुपये किमतीच्या ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमचा लाभ मिळेल, ज्याची वैधता 12 महिने असेल.

स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मेसेजेसमध्ये येणाऱ्या फसव्या लिंक्स ब्लॉक केल्या जातात आणि रिअल-टाइम अलर्ट दिले जातात. दर 30 दिवसांनी एकदा एक मोफत हॅलोट्यून दिले जाते. याव्यतिरिक्त कंपनी एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले द्वारे मोफत कंटेंट ॲक्सेस देते.

जिओ 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये काय ऑफर करते?

रिलायन्स जिओबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी 199 रूपयांमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देते. या प्लॅनची ​​वैधता 18 दिवसांची आहे, 28 दिवसांची नाही. दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा मोफत ॲक्सेस देखील मिळतो.

Follow Us