एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, 50 रुपयांपेक्षा कमी किमतीत डेटा आणि ओटीटीचा घ्या आनंद

एअरटेलने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 48 रुपयांचा एक नवीन डेटा व्हाउचर सादर केला आहे. या प्लॅनमध्ये किती जीबी हाय-स्पीड डेटा समाविष्ट आहे आणि कोणते ओटीटी फायदे उपलब्ध आहेत, ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, 50 रुपयांपेक्षा कमी किमतीत डेटा आणि ओटीटीचा घ्या आनंद
airtel plan
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2026 | 12:32 AM

एअरटेल कंपनीने त्यांच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक नवीन 48 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा एक डेटा व्हाउचर असून यामध्ये डेटासोबत ओटीटी (ओव्हर-द-टॉप) लाभही वापरकर्त्यांना घेता येणार आहे. हा नवीन 48 रुपयांचा प्लॅन अनेक सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. आयपीएल 2026 आधीच सुरू झाली आहे, त्यामुळेच आता टेलिकॉम कंपन्या कमी बजेटच्या प्लॅन्समध्येही ओटीटी लाभ देत आहेत, जेणेकरून वापरकर्ते इंडियन प्रीमियर लीग 2026 चा आनंद घेऊ शकतील. चला तर मग आजच्या लेखात या नवीन डेटा व्हाउचरच्या अधिक फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 1 जीबी 4जी डेटा आणि एका महिन्याचे जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. 1 जीबी डेटा अपुरा वाटत असला तरी या प्लॅनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जिओहॉटस्टारचा ॲक्सेस समाविष्ट आहे. कंपनीने योग्य वेळी केलेला हा एक बदल आहे, कारण आयपीएल 2026 पाहण्यासाठी वापरकर्ते जिओहॉटस्टारचा अधिक वापर करत आहेत. त्यामुळे हा नवीन प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर रिचार्जसाठी उपलब्ध आहे. तुम्ही कंपनीच्या ॲपद्वारे देखील हा प्लॅन रिचार्ज करू शकता आणि आयपीएल चा आंनद घेऊ शकता. ज्या लोकांना फक्त जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन हवे असेल त्यांचासाठी हा प्लॅन व्हाउचर फायदेशीर ठरेल.

हे डेटा व्हाउचर जवळपास प्रत्येक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. वापरकर्त्यांसाठी JioHotstar सह येणारा हा एकमेव एअरटेल डेटा प्लॅन नाही. कंपनी आपल्या 195 रुपये, 279 रुपये आणि 361 रुपयांच्या प्लॅनसोबत OTT चे फायदे देखील देते. 279 रुपयांच्या प्लॅनमध्ये Netflix आणि ZEE5 चे सबस्क्रिप्शन मिळते आणि तो एका महिन्यासाठी वैध आहे.

जिओ 100 प्लॅन

रिलायन्स जिओबद्दल बोलायचे झाल्यास प्रीपेड वापरकर्त्यांना जिओ हॉटस्टारच्या लाभांसाठी किमान 100 रूपये खर्च करावे लागतात. मात्र, खर्चात फरक असेल, तर लाभांमध्येही फरक आहे. एअरटेलच्या 48 रूपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटा मिळतो, तर जिओच्या 100 रूपयांच्या प्लॅनमध्ये 5G डेटा मिळतो आणि या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार मोबाईलचा 30 दिवसांचा ॲक्सेससुद्धा मिळतो.

Follow Us