शॉपिंगसाठी व्हा तयार कारण Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल लवकरच होतोय सुरू, पहा या धमाकेदार ऑफर्स
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच भारतात सुरू होणार आहे. आगामी सेलसाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे. तसेच या सेलमध्ये विविध उत्पादनाच्या सुटबद्दल तसेच सेल कधी सुरू होणार आहे हे जाणून घेऊयात...

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने शुक्रवारी जाहीर केले की अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच भारतात सुरू होणार आहे. आगामी कार्यक्रमासाठी एक समर्पित मायक्रोसाइट आता अमेझॉनवर लाईव्ह आहे ज्यामध्ये आगामी बँक सवलती आणि डीलची माहिती देण्यात आली आहे. तर अमेझॉनच्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅब्लेट, लॅपटॉप, पीसी, गेमिंग कन्सोल, स्मार्ट ग्लासेस, वॉशिंग मशीन, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि स्मार्ट होम अप्लायन्सेससह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने लक्षणीयरीत्या कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. तर फ्लिपकार्टने देखील अलीकडेच त्यांचा सेल जाहीर केला आहे. फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल 2026 जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल.
अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये 10 टक्क्यांपर्यंत बँक डिस्काउंट उपलब्ध असेल
ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने घोषणा केली आहे की त्यांचा अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच भारतात सुरू होत आहे, ज्यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सूट दिली जाईल. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरील एका समर्पित मायक्रोसाइटनुसार लवकरच सुरू होणाऱ्या सेल कार्यक्रमादरम्यान एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 10 टक्के त्वरित सूट दिली जाईल. याव्यतिरिक्त एसबीआय कार्ड असलेल्या ग्राहकांना ईएमआय व्यवहारांवरही हीच सूट मिळेल.
तसेच Amazon ने अद्याप त्यांच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 ची नेमकी तारीख आणि कालावधी जाहीर केलेली नाही. सेल इव्हेंट दरम्यान कंपनी दररोज ‘8 pm Deals’, ‘Trending Deals’, ‘Blockbuster Deals’, ‘Blockbuster Deals with Exchange’ आणि ‘Top 100 Deals’ ची यादी देईल. यात ‘Price Crash Store’, ‘Freebie Central’, ‘Exchange Mela’ आणि ‘Sample Mania’ देखील असतील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सवलतीच्या दरात Amazon कूपन देखील देईल. त्यामुळे ग्राहकांना या सेलमध्ये आवश्यक असलेल्या वस्तु योग्य दरात खरेदी करता येणार आहे.
अमेझॉनने सांगितले आहे की ट्रांजॅक्शन सुरू करताना जलद चेकआउटसाठी ग्राहकांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती जोडण्याची शिफारस करते. शिवाय कंपनी वापरकर्त्यांना त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर ऑनलाइन व्यवहार सक्रिय करण्याचा आणि त्यांचा डिलिव्हरी पत्ता सेव्ह किंवा अपडेट करण्याचा सल्ला देते. येत्या काही दिवसांत सेल कार्यक्रमाबद्दल अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे. कदाचित त्यानंतर कंपनी सेलची तारीख जाहीर करतील.
आधी सांगितल्याप्रमाणे Amazon चा भारतातील मुख्य स्पर्धक, Flipkart ने अलीकडेच घोषणा केली की त्यांचा Republic Day Sale 2026 17 जानेवारीपासून सुरू होईल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने पुष्टी केली आहे की ते Flipkart Black आणि Flipkart Plus ग्राहकांना आगामी सेल कार्यक्रमासाठी 24 तास आधी प्रवेश देईल. शिवाय, कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के त्वरित सवलत आणि ‘सोपी EMI’ पर्याय देईल. याव्यतिरिक्त, इतर निवडक बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना 15 टक्क्यांपर्यंत त्वरित सवलत दिली जाईल.
