AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Republic Day Offers: फोनपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत ‘या’ खास उपकरणावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, आताच घ्या ऑफरचा लाभ

ॲमेझॉनवरून खरेदी करत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ॲमेझॉनवर स्मार्टफोनपासून घरगुती उपकरणांपर्यंत सर्व काही सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. ॲमेझॉन सेलमध्ये तुम्हाला कोणते फोन आणि कोणते होम अप्लायन्सेस कमी किंमतीत मिळू शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Amazon Republic Day Offers: फोनपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत 'या' खास उपकरणावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, आताच घ्या ऑफरचा लाभ
| Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 3:45 PM
Share

प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲमेझॉनवर अनेक उत्पादनावर मोठं मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहे. तसेच तुम्हाला मोबाईल फोन आणि घरगुती वस्तू देखील कमी किमतीत विकल्या जाऊ लागल्या आहेत. म्हणजेच तुम्हाला कमी किमतीत नवीन फोन आणि घरगुती उपकरणे खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. ॲमेझॉनवर २३ जानेवारीपासून सुरू झालेला फॅब फोन फेस्ट सेल २७ जानेवारीपर्यंत लाइव्ह राहणार असून, या दरम्यान महागडे स्मार्टफोन कमी किमतीत मिळू शकतील. सेलदरम्यान प्रॉडक्ट डिस्काऊंटव्यतिरिक्त अतिरिक्त बचतीसाठी बँक ऑफरचाही फायदा घेऊ शकता.

ॲमेझॉन फॅब फोन फेस्टमध्ये उपलब्ध आहेत हे बेस्ट डील्स

तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ॲमेझॉन सेलमध्ये OnePlus 13R च्या 12 जीबी /256 जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेला स्मार्टफोन 42,998 रुपयांऐवजी बँक ऑफरसह 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच Samsung Galaxy S23 Ultra 5G च्या १२ जीबी रॅम /२५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ५२ टक्के सूटनंतर ७१,९९९ रुपये झाली असून तुम्ही हे फोन खरेदी करू शकता.

Honor 200 5G फोनचा 8 जीबी /256 जीबी स्टोरेज व्हेरियंट 40% सवलतीनंतर 23,998 रुपयांना विकला जात आहे, अशात तुम्ही जर बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ घेतल्यानंतर हे मॉडेल बँक आणि कूपन डिस्काऊंटनंतर 19,999 रुपयांना उपलब्ध होईल. Motorola Razr 50 च्या 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 54,998 रुपये आहे, परंतु बँक ऑफरनंतर हा फोन तुम्ही 49,999 रुपयांमध्ये खरेदी शकता.

Hitachi 1.5 Ton 3 Star AC

१.५ टन वजनाचे हे स्प्लिट एसी मॉडेल ॲमेझॉनवर ४१ टक्के सवलतीनंतर ३६,९९० रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे. या लिमिटेड पीरियड डीलचा फायदा घेऊन तुम्ही एचडीएफसी, ॲक्सिस किंवा फेडरल बँक कार्डद्वारे पेमेंट करून अतिरिक्त 2,000 रुपयांची देखील बचत करू शकता.

Fully Automatic Washing Machine वर सूट

हायर कंपनीच्या या 8 किलो वॉशिंग मशीनचा टॉप लोड व्हेरियंट ॲमेझॉनवर 50 टक्के सवलतीनंतर 17,490 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तसेच वॉशिंग मशीन खरेदी करताना तुम्ही 2,000 रुपयांच्या बँक डिस्काऊंटचा ही लाभ घेऊ शकता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.