अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

मुंबई : इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी नवं फीचर आणलं आहे. व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आता अँड्रॉईड मोबाईलधारकांनाही फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन फीचर उपलब्ध करुन देणार आहे. याआधी व्हॉट्सअॅपने आयओएस (iOS) वापरकर्त्यांना हे फीचर उपलब्ध करुन दिले होते. व्हॉट्सअॅप बाबतच्या नव्या फीचरची माहिती देणाऱ्या एका वेबसाईच्या अहवालात व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.83 ची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅप आता आपल्या वापरकर्त्यांना […]

अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी नवं फीचर आणलं आहे. व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आता अँड्रॉईड मोबाईलधारकांनाही फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन फीचर उपलब्ध करुन देणार आहे. याआधी व्हॉट्सअॅपने आयओएस (iOS) वापरकर्त्यांना हे फीचर उपलब्ध करुन दिले होते.

व्हॉट्सअॅप बाबतच्या नव्या फीचरची माहिती देणाऱ्या एका वेबसाईच्या अहवालात व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.83 ची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅप आता आपल्या वापरकर्त्यांना फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन फीचर देण्यावर काम करत आहे. हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंट स्कॅनरद्वारे उघडता येणार आहे. खरंतर सध्या अनेकांच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये अॅप लॉक करणारे फीचर देण्यात येत आहे. त्याद्वारे कोणतेही अॅप फिंगरप्रिंट स्कॅनरचा उपयोग करुन लॉक किंवा अनलॉक करता येते. त्याचा उपयोग व्हॉट्सअॅपसाठीही होतो.

अँड्रॉईडमध्ये देण्यात येणारे हे नवे फीचर वापरकर्त्यांना प्रायव्हसी टॅबमध्ये जाऊन वापरता येणार आहे. या ठिकाणी आयओएससारखेच पर्याय दिसतील. यातून आपण एकदा अनलॉक केल्यावर किती वेळ फिंगरप्रिंटची आवश्यकता असणार नाही हे ठरवता येणार आहे. यात 1 मिनिट, 10 मिनिटे आणि 30 मिनिटे असे पर्याय असतील. अन्य एका अहवालानुसार व्हॉट्सअॅप अँड्रॉईडसाठी डार्क मोडचेही फीचर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची सध्या चाचणी सुरु असून लवकरच सर्व वापरकर्त्यांना हे फीचर वापरता येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.