स्मार्टफोन कॅमेऱ्याद्वारे कोरोना टेस्ट करता येणार, नवं तंत्रज्ञान तयार

अक्षय चोरगे

Updated on: Jan 30, 2022 | 5:19 PM

कोविड-19 या साथीच्या रोगाने (covid-19 pandemic) आपल्या आरोग्य सेवेच्या मूलभूत पायाभूत सुविधांवर लक्षणीय परिणाम केला आहे, ज्यामध्ये दररोज हजारो लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांचा समावेश आहे.

स्मार्टफोन कॅमेऱ्याद्वारे कोरोना टेस्ट करता येणार, नवं तंत्रज्ञान तयार
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : कोविड-19 या साथीच्या रोगाने (covid-19 pandemic) आपल्या आरोग्य सेवेच्या मूलभूत पायाभूत सुविधांवर लक्षणीय परिणाम केला आहे, ज्यामध्ये दररोज हजारो लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक लॅब किंवा अगदी सेल्फ टेस्ट किटमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) किंवा आरटी – पीसीआर (RT-PCR) यांचा समावेश होतो, जे अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर आहेत, विशेषतः कमी वयोगटातील. पण आता, संशोधक COVID-19 साठी एक नवीन टेस्ट टेक्नोलॉजी विकसित करत आहेत ज्यामुळे प्रत्येकाला, अगदी कमी उत्पन्न असलेल्या गटांना देखील त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून COVID-19 संसर्गाची चाचणी करणे शक्य होईल.

CNET ने म्हटलं आहे की, नवीन टेस्ट टेक्नोलॉजी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा येथील संशोधकांनी विकसित केली आहे. यामध्ये सुरुवातीला $100 पेक्षा कमी किमतीची उपकरणे आवश्यक आहेत, CNET ने अहवाल दिला आहे की. सर्व उपकरणे इंस्टॉल केल्यानंतर प्रत्येक टेस्टची किंमत फक्त $7 (जवळपास 525) इतकी असेल.

कशी करणार चाचणी?

टेस्ट किट इंस्टॉल करण्यासाठी हॉट प्लेट, रिऍक्टिव्ह सोल्यूशन आणि स्मार्टफोन यांसारखी सामान्य उपकरणं आवश्यक आहेत. स्मार्टफोनवर बॅक्टिकाउंट नावाचे संशोधकांचे विनामूल्य अॅप डाउनलोड करणे देखील आवश्यक आहे. हे अॅप फोनच्या कॅमेऱ्याने कॅप्चर केलेल्या डेटाचे विश्लेषण करेल आणि युजर्सला सूचित करेल की त्यांचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे.

जामा नेटवर्क ओपनवर प्रकाशित झालेल्या पेपरनुसार, युजर्सना त्यांची लाळ (saliva) हॉट प्लेटवर ठेवलेल्या टेस्ट किटमध्ये ठेवावी लागेल. यानंतर, त्यांना प्रतिक्रियात्मक (रिएक्टिव्ह) सोल्यूशन त्यात टाकावे लागेल, त्यानंतर द्रवाचा रंग बदलेल. द्रवाचा रंग किती लवकर बदलतो यावर आधारित लाळेतील व्हायरल लोडचे प्रमाण याचा अंदाच लावण्यासाठी अॅपचा वापर केला जाईल.

स्मार्ट-लॅम्प (लूप-मीडिएटेड आयसोथर्मल अॅम्प्लिफिकेशन) नावाच्या तंत्रज्ञानाची मनोरंजक गोष्ट अशी आहे की ते अल्फा, बी.1.1.7 (यूके व्हेरिएंट) सह सर्व प्रकारचे कोविड-19 संसर्ग शोधू शकते; गामा, p.1 (ब्राझिलियन व्हेरिएंट), डेल्टा, b.1.617.2 (भारतीय व्हेरिएंट); एप्सिलॉन, B.1.429 (CAL20C) आणि Iota, B.1.526 (न्यूयॉर्क व्हेरिएंट) चा यात समावेश करण्यात आला आहे.

स्मार्टफोनवरून कोरोना चाचणी तंत्रज्ञानावर संशोधन

हे टेस्टिंग अद्याप मोठ्या प्रमाणावर वापरासाठी तयार नाही कारण संशोधकांनी केवळ 50 रूग्णांसह तंत्रज्ञानाची चाचणी केली, ज्यात 20 लक्षणे असलेल्या आणि 30 लक्षणे नसलेल्या रूग्णांचा समावेश आहे आणि सॅमसंग गॅलेक्सी S9 स्मार्टफोन त्यासाठी कॅलिब्रेट केला. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे फीचर किंवा अॅप लवकरच बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा करू नका.

इतर बातम्या

11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स

PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI