Apple ने ‘हा’ अॅप स्टोअरमधून हटवला, युजर्सची माहिती लीक होण्याची शक्यता

या अॅपच्या माध्यमातून संयुक्त अरब अमीरात सरकार युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या अॅपचा वापर करत होते, असं न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

Apple ने 'हा' अॅप स्टोअरमधून हटवला, युजर्सची माहिती लीक होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 24, 2019 | 11:07 AM

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी अॅपलने आपल्या प्ले स्टोअरमधून ToTok नावाचा सौदी अरबचा चाटिंग अॅप हटवला (Apple Delete totok app) आहे. या अॅपमुळे युजर्सच्या फोनमधील डेटा लीक होण्याची शक्यता आहे, असं न्यूयॉर्क टाईम्सने एका वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानंतर अॅपलकडून तातडीने हा अॅप हटवण्यात (Apple Delete totok app) आला आहे.

या अॅपच्या माध्यमातून संयुक्त अरब अमीरात सरकार युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या अॅपचा वापर करत होते, असं न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. यूरोप, आशिया, अफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत या अॅपचे मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. तसेच युनायटेड स्टेटमध्ये हा अॅप सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.

अॅपच्या मागे हॅकिंग कंपनी

हा अॅप युजर्सची चाटिंग, लोकेशन, रिलेशनशिप, आवाज आणि फोटो ट्रॅक करत होता, असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. Breej Holding कंपनीने हा अॅप तयार केला आहे, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सच्या कम्प्युटर सुरक्षा तज्ञांनी संशोधन केल्यावर समोर आली आहे.

Breej Holding ही अबू धाबीमधील कम्प्युटर इंटेलिजेन्स आणि हॅकिंग कंपनी Dark Matter सोबत जोडलेली आहे. ही माहिती समोर आल्यावर अॅपलशिवाय गुगलनेही अँड्रॉईड प्ले स्टोअरमधून हा अॅप हटवला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.