साऊंड ग्लो लायटिंग इफेक्ट आणि 360 डिग्री ऑडियो सपोर्ट, लाँच झाला Apple HomePod Mini 2
ऍपलने नवीन होमपॉड मिनी आणि ऍपल टीव्ही 4K सह आपल्या स्मार्ट होम उत्पादनांना अद्ययावत केले आहे. स्मार्ट वैशिष्ट्ये, सुधारित ऑडिओ, एआय-सक्षम सिरी आणि कनेक्टेड होमच्या माध्यमातून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Apple ने स्मार्ट होम लाईनअपला रिफ्रेश केले आहे. ज्यात नेक्स्ट-जनरेशन HomePod Mini 2 आणि एक नव्या Apple TV 4K ला लॉन्च केले आहे. यात चांगला ऑडिओ आणि स्मार्ट होम कंट्रोल सामील आहे. होमपॉड मिनी 2 मध्ये 360 डिग्री ऑडियो, साऊंड ग्लो लायटिंग इफेक्ट आणि स्मार्ट होम कंट्रोल देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नवीन एप्पल टीव्ही 4K मध्ये A19 चिप, हँड्स-फ्री व्हॉईस कंट्रोल आणि कंटेन्ट शोधण्यासाठी जास्त बोलता येणारा Siri चा अनुभव मिळणार आहे.
Apple HomePod Mini 2 Price in India
अप्पलने भारतात होमपॉड मिनी 2ची किंमत 18,900 रुपये निश्चित केली आहे. या डिव्हाईसची प्री बुकींग सुरु झाली आहे. आणि हे प्रोडक्ट 30 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही स्मार्ट स्पीकरला पिंक,ग्रीन,ब्ल्यू,व्हाईट आणि मिडनाईट अशा पाच रंगात खरेदी करु शकणार आहे. या दरम्यान सिरी एआय येणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे होमपॉड मिनी 2 मध्ये मिळतील. हा स्पीकर होमपॉड सॉफ्टवेअर 27.2 सोबत कम्पॅटेबल आहे.
HomePod Mini 2 मध्ये नवीन काय ?
या नेक्स्ट जनरेशन मॉडलमध्ये S10 चिपचा वापर झाला आहे. कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे 360 डिग्री ऑडियो देण्याची वचन हे गॅझेट देते. युजर्स एकाच स्पीकरने म्युझिक चालवू शकतात. स्टिरिओ साऊंटसाठी दोन स्पीकरशी जोडू शकता. या मल्टीरुम ऑडिओसाठी अनेक स्पीकर कनेक्ट करु शकतात.
याचे एक खास वैशिष्ट्ये सिरी एआय आहे. हे येणाऱ्या सॉफ्टवेअरना अपडेट करेल. अपग्रेडेड असिस्टन्टला पर्सनल कॉन्टेक्स्टला समजणे, जास्त नैसर्गिक चर्चा करणे आणि म्यूझिक डिस्कवरीला चांगले करण्यासाठी तयार केलेला आहे. जेव्हा यास एप्पल इंटेलिजन्सवाल्या आयफोन वा आयपॅडसोबत पेअर केले जाते तेव्हा हा वेगवेगळ्या ऐप्स मध्ये माहिती संबंधित रिक्वेस्टला हँडल करु शकतो.उदाहरणार्थ जसे कोणतेही गाणे शोधणे, इमेलमध्ये रेसिपी शोधणे, वा कॅलेंडर इव्हेंटशी संबंधित रिमाईंडर सेट करणे.
स्पीकर घरातील सहा लोकांचे आवाज ओळखू शकते आणि त्यांचे म्युझिक आणि दूसऱ्या सवयींना पर्सनलाईज करु शकते. हा होम हबसारखाही काम करु शकतो. ज्यामुळे युजर होम एप्प द्वारे कनेक्टेड डिव्हाईसना दूरवरुन कंट्रोल करु शकतो.
Apple TV 4K किंमत आणि फिचर्स
लिव्हींग रूमचे बोलायचे तर नवीन एप्पल टीव्ही 4K A19 चिपवर काम करतो. यासंदर्भात एप्पलचे म्हणणे आहे की हा गेल्या जनरेशनच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत वेगवान सीपीयू परफॉर्मेंस आणि दुप्पट जीपीयू परफॉर्मेंस देऊ शकतो. यात जास्त चांगला स्ट्रीमिंगसाठी एक डेडिकेटेड AV1 डिकोडर देखील आहे.
या डिव्हाईसमध्ये तीन फार-फिल्ड मायक्रोफोन आहेत. ज्यामुळे युजर रिमोट न पकडताही विना व्हॉईन कमांडचा वापर करुन प्लेबॅक कंट्रोल करु शकतो. आणि शो शोधू शकतो. सिरी एआय कंटेंन्ट डिस्कव्हरीसाठी एक फुल-स्क्रीन इंटरफेस देऊ शकतो. आणि शो वा फिल्म चालताना फॉओ-अप प्रश्नांची उत्तर देऊ शकतो.
Apple TV 4K एक स्मार्ट होम हब म्हणूनही काम करु शकतो. जे कम्पॅटिबल डोरबेलने नोटिफिकेशन दाखवू शकतो आणि ऑटोमेशन आणि एक्सेसरी कंट्रोलला सपोर्ट करतो. एप्पल इंटेलिजन्स कॅमेरा एक्टिव्हीटीचे डिस्क्रीप्शन जनरेट करु शकतो. आणि होम ऐपमध्ये नोटिफिकेशन समराईज करु शकतो.
Apple TV 4K Price in India
भारतात नवी एप्पल टीव्ही 4K (चौथे जनरेशन) ची किंमत 39,900 रुपये आहे. आणि प्री बुकिंग आज 13 ऑक्टोबर सुरु झाली आहे. आणि 13 नोव्हेंबरपासून यांची विक्री सुरु होणार आहे.
