Apple मध्ये बग शोधा आणि 7 कोटी मिळवा, कंपनीकडून मोठी ऑफर

प्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनीने सध्या बग बाऊंटी (bug-bounty) प्रोग्राम सुरु केला आहे. यामध्ये जो कुणी आयफोन ऑपरेटिंग सिस्टममध्ये (IOS) कशा प्रकारचाही टेक्निकल फॉल्ट शोधून काढेल, त्याला कंपनीकडून 7 कोटी रुपयांचे बक्षीस दिलं जाईल.

Apple मध्ये बग शोधा आणि 7 कोटी मिळवा, कंपनीकडून मोठी ऑफर
अ‍ॅपल 7 जूनला लॉन्च करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स
Follow us
| Updated on: Aug 12, 2019 | 5:31 PM

मुंबई : प्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनीने सध्या बग बाऊंटी (bug-bounty) प्रोग्राम सुरु केला आहे. यामध्ये जो कुणी आयफोन ऑपरेटिंग सिस्टममध्ये (IOS) कशा प्रकारची तांत्रिक त्रुटी (Technical Fault) शोधून काढेल, त्याला कंपनीकडून 7 कोटी रुपयांचे बक्षीस दिलं जाईल. यामुळे कंपनीलाही एखादा विशेष आणि वाईट बग आपल्या सिस्टममध्ये असल्याची माहिती मिळू शकते.

कंपनीने दुसऱ्या प्रोडक्टसाठीही हा प्रोग्राम सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी खूप पैसेही खर्च करत आहे.

कंपनी या बग बाऊंटी प्रोग्रामचा विस्तार करणार आहे. आयओएस प्रोग्रामसोबत कंपनी आता नवीन बग-बाऊंटी प्रोग्राम सुरु करेल. या माध्यमातून संशोधक macOS, tvOS, watchOS आणि iCloud प्लॅटफॉर्मवरही टेक्निकल फॉल्ट शोधू शकतात. यासोबत त्यांना मोठी रक्कम म्हणून बक्षीस स्वरुपात दिली जाईल, अशी माहिती अॅपलचे सिक्युरिटी इंजिनिअर प्रमुख यांनी एका परिषदेत दिली.

प्रोग्राममध्ये बदल केल्यानंतर कंपनीने बक्षीस स्वरुपात दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली आहे. जर एखाद्या संशोधकाने बग शोधून काढला तर त्याला आता 1 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात अंदाजे 7 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तुम्ही जर आयफोन किंवा मॅकबुकसारख्या अॅपलच्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये विशेष असा बग शोधून काढला तर तुम्ही 7 कोटी रुपयांचे बक्षिस जिंकू शकता.

याशिवाय अॅपलकडून संशोधकांना विशेष ‘dev’ आयफोनही दिला जाईल. हा फोन कंपनीच्या आयओएस सिक्युरिटी रिसर्च डिव्हाईस प्रोग्रामचा हिस्सा असले. या माध्यमातून प्रोग्रामर्स आयफोनच्या सॉफ्टवेअरला हायर डिग्रीसह एक्सेस करु शकतात. ज्यामुळे आयफोनच्या सिक्युरिटीमध्ये वाढ केली जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.