Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!

| Updated on: Dec 27, 2021 | 9:49 PM

Apple काहीतरी नवीन आणणार आहे, ज्यामुळे तुम्ही सिमकार्डशिवाय(Simless)ही फोनवर बोलू शकाल. Apple एक iPhone घेऊन येत आहे, ज्यामध्ये सिम कार्ड घालण्यासाठी कोणताही स्लॉट नसेल.

Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!
प्रातिनिधिक फोटो/आयफोन
Follow us on

मुंबई : सिमकार्ड नसतानाही आपण एखाद्याला कॉल करू शकतो, असा विचार कधी केलाय का? हे शक्य आहे. होय. Apple काहीतरी नवीन आणणार आहे, ज्यामुळे तुम्ही सिमकार्डशिवाय(Simless)ही फोनवर बोलू शकाल. Apple एक iPhone घेऊन येत आहे, ज्यामध्ये सिम कार्ड घालण्यासाठी कोणताही स्लॉट नसेल. तो आयफोनच्या ई-सिमवर चालेल.

सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन?
Apple कंपनी iPhone 15 सिरीजमध्ये हे फीचर अपग्रेड करू शकते. मात्र, या लेटेस्ट फीचर स्मार्टफोनसाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. माहितीनुसार, कंपनी आपली iPhone 15 सिरीज 2023मध्ये लॉन्च करू शकते. iPhone 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असू शकतो. Apple Incने त्यांचे iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max e-SIMसह लॉन्च केले. पण आता चर्चा अशी आहे, की कंपनी लवकरच आयफोन सिम कार्डशिवाय उपलब्ध करण्याच्या विचारात आहे.

दोन ई-सिमसह येईल मोबाइल
यासंबंधीच्या एका ब्लॉगनुसार, 2023मध्ये येणार्‍या Apple iPhoneच्या प्रो मॉडेलमध्ये म्हणजेच iPhone 15 Proमध्ये फिजिकल सिम कार्ड स्लॉट नसेल. आयफोन कनेक्टिव्हिटीसाठी हे पूर्णपणे ई-सिम तंत्रज्ञानावर आधारित असेल. अॅपल अनेक दिवसांपासून यावर काम करत असल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा नवा फोन दोन ई-सिमसह येईल, असे ब्लॉगमध्ये सांगितले आहे. म्हणजेच यामध्ये दोन ई-सिम वापरण्यात येणार आहेत.

बाहेरचे सिम कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही
ई-सिम हे मोबाइल फोनसाठीचं व्हर्च्युअल सिम आहे. जे अगदी प्रत्यक्ष सिम कार्डसारखे दिसते आणि अगदी त्याच प्रकारे कार्य करते. तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कोणतेही बाहेरचे सिम कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही. सध्या भारतात रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल त्यांच्या युझर्सना ई-सिम फीचरची सुविधा देत आहेत.

ई-सिमचे फायदे काय?
ई-सिमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटर बदलल्यास, तुम्हाला सिम कार्ड बदलण्याची गरज नाही.
– जर तुमचा फोन जास्त गरम झाला किंवा पाण्यात भिजला तर सिम कार्ड खराब होण्याची शक्यता असते, परंतु ई-सिमवर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही.
– हे व्हर्च्युअल सिम आहे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी आहे.

WhatsApp Golden Logo : व्हाट्सअॅपच्या हिरव्या रंगाचा कंटाळा आलाय? ट्राय करा सोनेरी रंग, पाहा स्टेप्स…

Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत

OPPO Reno 7 5G न्यू ईयर एडिशन लॉन्च, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?