जेव्हा अॅपल वॉचने व्यक्तीचे प्राण वाचवले!

शिकागोमध्ये अॅपल वॉचमुळे एक व्यक्ती बुडता बुडता वाचला आहे. या व्यक्तीने या स्मार्ट वॉचला त्याचा जीव वाचवण्याचं श्रेय दिलं आहे.

जेव्हा अॅपल वॉचने व्यक्तीचे प्राण वाचवले!

वॉशिंगटन : शिकागोमध्ये अॅपल वॉचमुळे एक व्यक्ती बुडता बुडता वाचला आहे. या व्यक्तीने या स्मार्ट वॉचला त्याचा जीव वाचवण्याचं श्रेय दिलं आहे. न्यूज पोर्टल 9 टू 5 एमएसीच्या रिपोर्टनुसार, रविवारी फिलीप एशो हे शिकागोच्या क्षितिजाचा फोटो घेण्यासाठी 31 स्ट्रीट हार्बरहून मॅककॉर्मिक प्लेसपर्यंत एका जेट स्कीवर जात होते. इतक्यात एक मोठी लाट आली आणि ते पाण्यात पडले.

पाण्यात पडल्याने एशो यांचा मोबाईलही पाण्यात पडला. त्यानंतर एशो यांनी प्राण वाचवण्यासाठी आजूबाजूच्या नावेत असलेल्या लोकांना हाक मारली. मात्र, त्यांची हाक लोकांपर्यंत पोहोचली नाही. एशो आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत होते. मात्र, समुद्राच्या लाटा त्यांना पाण्याखाली नेत होत्या. इतक्यात एशो यांनी त्यांच्या मनगटावर असलेल्या अॅपल वॉचमधील फीचर सोफिस्टिकेटेड ऑपरेटिंग सिस्टीमच्या (SOS) मदतीने आपत्कालीन सेवेसाठी कॉल केला. त्यानंतर लगेच काही वेळात शिकागो पोलीस आणि फायर बोट तसेच हेलिकॉप्टर एशो यांच्या मदतीसाठी आले आणि एशो यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

जेव्हा कुठला युझर SOS च्या मदतीने कॉल करतो, तेव्हा अॅपल वॉच स्वचलीत पद्धतीने स्थानिक आपत्कालीन क्रंमांकावर फोन करते. काही देशात आणि भागांत युझर्स आपल्या गरजेनुसार या सेवेची निवड करतात.

नुकतंच अमेरिकेच्या एका डॉक्टरने Apple Watch Series 4 च्या मदतीने तरुणाचे प्राण वाचवले होते.या तरुणाने हातात Apple Watch Series 4 घातलेली होती. यामुळे डॉक्टरने अॅट्रअल फायब्रिलेशन ओळखलं. सध्या इसीजीचं हे फीचर भारतात अॅपल वॉचमध्ये उपलब्ध नाही. पण, अॅपल वॉच हे त्याच्या फीचर्समुळे आपत्कालीन प्रसंगांवर अनेकांची मदत करत असल्याचं समोर आलं आहे, हे विशेष.

संबंधित बातम्या :