VIDEO : खिळ्याने ठोकलं, लायटरने पेटवलं, सर्व परिक्षेत Asus 6Z पास

फ्लिप कॅमेरा सेटअप असल्यामुळे या स्मार्टफोनच्या मजबुतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, हा स्मार्टफोन प्रत्येक टेस्टमध्ये पास झाला आहे.

VIDEO : खिळ्याने ठोकलं, लायटरने पेटवलं, सर्व परिक्षेत Asus 6Z पास

मुंबई : स्मार्टफोन कंपनी Asus ने भारतात फ्लॅगशिप डिव्हाईस Asus 6Z लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये फ्लिप कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि यामध्ये कुठलाही नॉच किंवा होल-पंच कॅमेरा देण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर काहीच दिवसांत याचा ड्यूरेबिलिटी टेस्ट समोर आला. फ्लिप कॅमेरा सेटअप असल्यामुळे या स्मार्टफोनच्या मजबुतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, हा स्मार्टफोन प्रत्येक टेस्टमध्ये पास झाला आहे.

Asus 6Z स्मार्टफोनचा ड्यूरेबिलिटी टेस्ट यूट्यूब चॅनल JerryRigEverything वर अपलोड करण्यात आला. चॅनलचा संचालक जॅक मेने या स्मार्टफोनच्या डिस्प्लेपासून ते फ्लिप कॅमेरापर्यंत सर्वांवर अनेक टेस्ट करण्यात आले. या सर्व टेस्टमध्ये हा स्मार्टफोन पास झाला आहे.

जवळपास सात मिनिटांच्या व्हिडीओमध्ये या स्मार्टफोनवर अनेक टेस्ट करण्यात आले. या टेस्टनंतरही फ्लिप कॅमेरा आणि मशीन काम करत होतं. टेस्टनंतर कॅमरा मशीन आधीच्या तुलनेत अधिक चांगल्याने काम करत असल्याचं पाहायला मिळालं. त्याशिवाय याचा मोटर पावरिंग फ्लिप कॅमेरा प्रत्येकवेळी उघडत नाही, जर त्याला कुणी थांबवत असेल किंवा उघडण्यास कुठला अडथळा येत असेल तर लगेच मोबाईल स्क्रिनवर एक वॉर्निंग मेसेज येतो. बेन्ड टेस्टमध्येही हा स्मार्टफोन पास झाला आहे.

या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 6 लावण्यात आलेला आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रिनवर सहजासहजी स्क्रॅच येत नाही. तसेच, हा ग्लास डॅमेजही होत नाही. जॅक यांनी ग्लासवर टेस्ट करत असताना खिळ्यापासून ते चाकूपर्यंतच्या अवजारांचा या स्क्रिनला डॅमेज करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, लेव्हल 6 वर हलके स्क्रॅच दिसू लागतात, लेव्हल 7 वर स्क्रिनवर अधिक स्क्रॅट दिसतात. इतकंच नाही तर या स्मार्टफोनच्या साईडच्या भागालाही स्क्रॅच केले असता या फोनची फ्रेम अॅल्युमिनिअमपासून बनलेली आहे, हे लक्षात येतं.

Asus 6Zची फक्त फ्रेम नाही, तर वरील भाग आणि फ्लिप कॅमेराही मेटलपासून बनलेला आहे. यांनांही स्क्रॅचकरुन तपासण्यात आले. फ्लिप कॅमेऱ्याच्या मॉड्युलला पुर्णपणे मेटलपासून बनवण्यात आलं आहे. कंपनीनेही स्पेसीफिकेशन्समध्ये हेच सांगितलं आहे. स्मार्टफोनच्या रिअर पॅनलनप फिंगरप्रिंट सेंन्सर देण्यात आला आहे. टेस्टमध्ये फिंगरप्रिंट सेंन्सरवर स्क्रॅच केल्यानंतरही ते काम करतं. डिव्हाईसवर बर्न टेस्टही करण्यात आलं, यामध्येही हा स्मार्टफोन पास झाला. त्यामुळे या फोनसंबंधी कंपनीने केलेला दावा अगदी खरा ठरला आहे.

VIDEO :

Published On - 6:39 pm, Fri, 21 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI