AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान ! कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा, पण जरा जपूनच, बँक खाते होऊ शकते रिकामी

सावधान ! कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा, पण जरा जपूनच, बँक खाते होऊ शकते रिकामी (be careful about Register for the Corona Vaccine, your bank account may become empty)

सावधान ! कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा, पण जरा जपूनच, बँक खाते होऊ शकते रिकामी
सावधान ! कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा, पण जरा जपूनच
| Updated on: Mar 01, 2021 | 2:48 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीसाठी तुम्ही जर स्वत:च्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणार असाल तर जरा जपून. कोरोना लसीसाठी अनेक नागरिक बनावट अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करू लागले आहेत. या ठिकाणीही सायबर गुन्हेगारांनी घुसखोरी केली आहे. गुन्हेगारांनी लसीकरणाचाही गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. को-विनसारखेच बनावट संकेतस्थळ तयार करून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहे. बनावट संकेतस्थळांचा मेसेज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा मेसेज वाचून जर तुम्ही को-विन अ‍ॅपमध्ये नोंदणी करणार असाल तर सावधगिरी बाळगायला पाहिजे. कारण बेफिकीर नोंदणीमुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. सायबर गुन्हेगार आपल्या गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यांवर डल्ला मारू शकतात. सरकारने याबाबत नागरिकांना अ‍ॅलर्ट केले आहे. (Be careful about Register for the Corona Vaccine, your bank account may become empty)

अनेक नागरिकांनी बनावट संकेतस्थळांवर अपलोड केली माहिती

को-विनच्याच नावाने बनवलेल्या बनावट संकेतस्थळांवर अनेक नागरिकांनी आपली माहितीही अपलोड केली आहे. नागरिक या संकेतस्थळांवर आपले रजिस्ट्रेशन करून मोकळे झालेत. या नागरिकांना आता फसवणूक झाल्याची भिती हैराण करीत आहे. हे नागरिक बनावट संकेतस्थळावर नोंदवलेला स्वत:चा तपशील हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तपशील हटवण्याचा पर्यायच नसल्यामुळे अनेकांनी कपाळावर हात मारला आहे. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या पीआयबी पथकाने दिशानिर्देश जारी केले आहेत.

कशी होतेय फसवणूक ते पाहा

बनावट संकेतस्थळावर एक लिंक शेअर करण्यात आली आहे. लिंकवर क्लिक करताच सरकारच्या पेजशी हुबेहुब असलेले दुसरे बनावट पेज खुले होते. त्यावर एक फॉर्मही उघडतो. ज्या फॉर्ममध्ये आपला तपशील भरण्यास सांगितले जाते. हा सगळा तपशील व ओटीपी नंबर मागवून घेतला जातो. त्यानंतर रुग्णालयांची अर्थात लसीकरण केंद्रांची नावेही दाखवली जाते. मात्र यातून आपली फसवणूक झालीय हे नागरिकांच्या उशिराने लक्षात येतेय.

पीआयबीने दिला सतर्कतेचा इशारा

केंद्र सरकारच्या पीआयबी पथकाने नागरिकांना बनावट संकेतस्थळांबाबत अ‍ॅलर्ट केले आहे. http://selfregistration.preprod.co-vin.in हे संकेतस्थळ सरकारच्या को-विन संकेतस्थळाशी मिळतेजुळते आहे. यावरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा संकेतस्थळांना बळी न पडता कोरोना लसीकरणाबाबत कुठलीही आवश्यक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा @MoHFW_INDIA या ट्विटर अकाउंटला भेट द्यावी, असे पीआयबी टीमने स्पष्ट केले आहे.

रजिस्ट्रेशनसाठी कुठलेही अ‍ॅप नाही, आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

कोरोना लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी कुठलेही अ‍ॅप नसल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. प्ले स्टोरमधील को-विन अ‍ॅप हे सर्वसामान्य नागरिकांसाठी नसून ते केवळ सरकारी कामकाजाच्या वापरासाठी आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवरून हे स्पष्टीकरण दिले आहे. (Be careful about Register for the Corona Vaccine, your bank account may become empty)

इतर बातम्या

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

Sanjay Rathod | संजय राठोड राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील ‘राजकीय गुरु’च्या भेटीला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.