
BMW मोटररॅडने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपली परफॉर्मन्स ओरिएंटेड बाईक BMW S 1000 RR लाँच केली आहे. कंपनीने BMW S 1000 RR या बाईकची किंमतही जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, BMW S 1000 RR या बाईकची एक्स-शोरूम किंमत 21.10 लाख रुपये आहे.
BMW S 1000 RR बाईकचे बुकिंगही सुरू
कंपनीने बाईकच्या डिझाइनपासून पॉवरपर्यंत सर्व काही बदलले आहे. BMW S 1000 RR या बाईकचे बुकिंगही सुरू झाले आहे. एप्रिल 2025 पासून ज्या ग्राहकांनी BMW S 1000 RR ही बाईक बुक केली आहे, त्यांना कंपनी डिलिव्हरी करणार आहे.
ट्विन-हेडलॅम्प सेटअपसह कॉम्पॅक्ट डिझाइन
BMW S 1000 RR बाईकमध्ये ट्विन-हेडलॅम्प सेटअपसह कॉम्पॅक्ट डिझाइन आहे. यामुळे BMW S 1000 RR बाईक खूपच आकर्षक बनते. BMW S 1000 RR यात हाय विंडस्क्रीन, साईड विंगलेट आणि लोअर ट्रिपल क्लॅम्पचे मिश्रण आहे. BMW S 1000 RR ही बाईक ब्लॅक स्टॉर्म मेटॅलिक, ब्लूस्टोन मेटॅलिक आणि लाइट व्हाईट सॉलिड या तीन रंगांमध्ये BMW S 1000 RR बाईक लॉन्च करण्यात आली आहे.
BMW S 1000 RR मध्ये 999 सीसीचे इनलाइन-फोर सिलिंडर इंजिन आहे जे 13,750 RPM वर 210 एचपीपॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. BMW S 1000 RR यात पॉवर युनिट बाय-डायरेक्शनल क्विक-शिफ्टरसह सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, लाँच कंट्रोल, हिल स्टार्ट कंट्रोल, पिट लेन टाइमर असे अनेक फीचर्स BMW S 1000 RR या बाईकमध्ये देण्यात आले आहेत.
BMW S 1000 RR 3.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग
BMW S 1000 RR 3.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, त्याचा टॉप स्पीड ताशी 300 किमी नोंदवण्यात आला आहे.
ऑटो एक्स्पोमध्ये BMW S 1000 RR च्या लाँचिंगबद्दल बोलताना BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पावाह म्हणाले, “नवीन BMW S 1000 RR आपले नेतृत्व स्थान मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. BMW S 1000 RR ही बाईक रेसिंग शौकिनांना एक वेगळीच अनुभूती देईल, असे ते म्हणाले