AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL चे जबरदस्त बजेट प्लॅन…. कमी पैशांमध्ये मिळेल इंटरनेट डेटा अन्‌ फ्री कॉलिंग सुविधा

बीएसएनएलचे अनेक प्लॅन असे आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पध्दतीचे इंटरनेट ब्राउझिंगलचा आनंद घेता येणार आहे. या शिवाय फ्री कॉलिंग संबंधित विविध प्लॅनचाही यात समावेश करण्यात आलेला आहे.

BSNL चे जबरदस्त बजेट प्लॅन.... कमी पैशांमध्ये मिळेल इंटरनेट डेटा अन्‌ फ्री कॉलिंग सुविधा
BSNL BBNLImage Credit source: TV9
| Updated on: May 26, 2022 | 2:29 PM
Share

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील दुसर्या स्पर्धक कंपन्यांसारखी आपल्या ग्राहकांना एक चांगला इंटरनेट प्लॅन देत आहे. बीएसएनएलचे अनेक प्लॅन असे आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पध्दतीचे इंटरनेट ब्राउझिंगलचा (Internet browsing) आनंद घेता येणार आहे. या शिवाय फ्री कॉलिंग संबंधित विविध प्लॅनचाही यात समावेश करण्यात आलेला आहे. आज आपण या लेखातून बीएसएनएलच्या विविध प्लॅनची माहिती घेणार आहोत, या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना मुबलक इंटरनेट सेवा व पूर्णपणे फ्री कॉलिंग (free calling) सेवेचाही लाभ घेता येणार आहे. तुम्ही दिलेल्या कुठल्याही प्लॅनला सबस्क्राईब करुन आनंद घेउ शकता.

बीएसएनएल एसटीव्ही 99

बीएसएनएल एसटीव्ही 99 प्लॅन 22 दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये पर्सनलाईझ रिंग बॅक टोन, अनलिमिटेड व्हाईस कॉलची सुविधा मिळणार आहे. परंतु या प्लॅनसोबत ग्राहकांना इंटरनेट डेटा मिळणार नाही.

बीएसएनएल एसटीव्ही 187

या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डाटा मिळेल यासह अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. रोज 100 एसएमएसदेखील फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल.

बीएसएनएल प्लॅन 153

153 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा मिळेल सोबत अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि 100 एसएमएस फ्री उपलब्ध होणार आहेत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल.

बीएसएनएल प्लॅन 197

197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डाटा मिळणार आहे. सोबत युजर्सना दररोज 100 एसएमएस फ्री असणार आहे. यासह युजर्स 18 दिवसांसाठी झिंक म्यूझिक ॲप्लिकेशनचा वापर करु शकती. प्लॅनची वैधता 180 दिवसांची असणार आहे.

बीएसएनएल प्लॅन 199

या प्रीपेड प्लॅनवर युसर्जना अनलिमिडेट व्हाईस कॉल आणि 250 मिनिट FUP मिळणार आहे. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. याची वैधता 30 दिवसांची असणार आहे.

बीएसएनएल प्लॅन 249

249 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटासोबत अनलिमिटेड व्हाईस कॉल मिळणार आहे. रोज 100 एसएमएस फ्री देण्यात येणार आहे. याची वैधता 60 दिवसांची असणार आहे.

बीएसएनएल प्लॅन 250

बीएसएनएलच्या 250 प्रीपेड प्लॅनला 40 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 250 मिनिटे व्हाइस कॉल, 100 एसएमएस, 3 जीबी इंटरनेट डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येईल.

बीएसएनएल प्लॅन 298

या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डाटा, अनलिमिटेड व्हाईस कॉल, EROS NOW चे सब्सक्रिप्शन, 100 एसएमएस मिळणार आहे. याची वैधता 56 दिवसांची असणार आहे.

बीएसएनएल प्लॅन 319

या प्लॅनमध्ये 75 दिवसांसाठी 10 जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि 300 एसएमएस दरदिवशी मिळणार आहेत.

बीएसएनएल प्लॅन 365

बीएसएनएलच्या 365 प्रीपेड प्लॅनमध्ये 65 दिवसांची वैधता आणि रोज 2 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. सोबत 100 एसएमएस आणि अनलिमिडेट व्हाईस कॉलिंगची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

बीएसएनएल प्लॅन 429

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1 जीबी इंटरनेटा डेटा, अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिवस मिळणार आहेत.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.