फ्लिपकार्टची बंपर ऑफर, अॅपल आणि आसुससह अनेक लॅपटॉपवर मोठी सूट

तुम्ही देखील अनेक दिवसांपासून लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या ‘Flipstart Days’ सेल सुरु आहे.

फ्लिपकार्टची बंपर ऑफर, अॅपल आणि आसुससह अनेक लॅपटॉपवर मोठी सूट


मुंबई : तुम्ही देखील अनेक दिवसांपासून लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या ‘Flipstart Days’ सेल सुरु आहे. यात फ्लिपकार्टने अॅपल आणि आसुससह अनेक लॅपटॉपच्या खरेदीवर मोठी सूट दिली आहे. 3 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर आकर्षक सूट मिळेल. या ऑफरमध्ये अॅपल, आसुस आणि एसर सारख्या अनेक कंपन्यांच्या शानदार लॅपटॉपचा समावेश आहे.

Acer Swift 5 (Core i7 8th Gen)

या लॅपटॉपमध्ये 8GB DDR3 रॅम आणि 512 GB SSD ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 64-बिट विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमही आहे. या लॅपटॉपला 14 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या लॅपटॉपवर तब्बल 22 टक्क्यांची सुट मिळणार आहे. त्यामुळे हा लॅपटॉप 81 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Asus Zenbook 13 (Core i5 8th Gen)

आसुसच्या या लॅपटॉपचा डिस्प्ले 13 इंचाचा आहे. यात इंटेल कोर i5 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 8GB DDR3 रॅम आणि 256GB SSD ची सुविधा देण्यात आली आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आसुसच्या या लॅपटॉपवर 20 टक्क्यांची सुट आहे. सवलतीनंतर हा लॅपटॉप 62 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Asus Vivobook 14 (Core i5 8th Gen)

आसुसच्या या लॅपटॉपचा डिस्प्ले 14 इंचाचा आहे. यात इंटेल कोर i5 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 8GB DDR रॅम आणि 512GB SSD मेमरी देण्यात आली आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आसुसच्या या लॅपटॉपवर 17 टक्क्यांची सुट आहे. सवलतीनंतर हा लॅपटॉप 48 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Asus Vivobook 14 (Core i5 7th Gen)

आसुसच्या या लॅपटॉपला 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे. तसेच 4GB DDR4 रॅम आणि 256GB SSD मेमरी देण्यात आली आहे. हा लॅपटॉप 64 बिट विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आसुसच्या या लॅपटॉपवर 17 टक्क्यांची सुट आहे. सवलतीनंतर हा लॅपटॉप 33 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI