त्वरा करा ! क्रोमावर खरेदी करा अॅपल प्रोडक्ट, मिळेल 10 टक्के सूट

| Updated on: Feb 27, 2021 | 6:31 PM

क्रोमावर 7 मार्चपूर्वी खरेदी करा अॅपल प्रोडक्ट, मिळेल 10 टक्के सूट (Buy Apple products before March 7 on Chroma, get 10 percent discount)

त्वरा करा ! क्रोमावर खरेदी करा अॅपल प्रोडक्ट, मिळेल 10 टक्के सूट
अ‍ॅपल 7 जूनला लॉन्च करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स
Follow us on

मुंबई : टाटा समूहाची इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्युरेबेल्सची रिटेल सिरीज क्रोमाने अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या जयंतीनिमित्त #AppleAndCroma प्रोग्राम सुरू केला आहे. ग्राहक आता देशभरातील 180 हून अधिक क्रोमा स्टोअर्स आणि वेबसाईट क्रॉमा डॉट कॉमवर ‘ऑल थिंग्ज अॅपल’ चा अनुभव घेऊ शकतील. या प्रोग्रामअंतर्गत, ग्राहकांना प्रोडक्टशी संबंधित निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात येईल, चांगल्या डील आणि ऑफर्सबाबत माहिती दिली जाईल. (Buy Apple products before March 7 on Chroma, get 10 percent discount)

या उपक्रमांतर्गत ज्या ग्राहकांना अॅपल प्रोडक्ट खरेदी करण्यात रस आहे ते ग्राहक खरेदी करु शकतील. अॅपलच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत ग्राहकांना उत्पादनासाठी खरेदी करताना तज्ञ सल्ला देतील, जेणेकरून डिव्हाईस अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अॅपलच्या सर्व उत्पादनांवर उत्तम ऑफर देण्यात येत आहेत.

ग्राहकांना मिळणार 10 टक्के सूट

ग्राहकांना तीन किंवा त्यापेक्षा जास्त उपकरणांच्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. इतकेच नाही तर नवीन आयफोन खरेदी केल्यावर ग्राहकांना 24 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर 45 टक्क्यांपर्यंत खरेदी करण्याची ऑफरही देण्यात येईल. आयपॅड, मॅकबुक यांसारख्या बर्‍याच उत्पादनांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. ग्राहक या उपक्रमात विविध प्रकारच्या ऑफर मिळवू शकणार आहेत.

ऑफरचा अवधी फक्त 7 मार्चपर्यंत

ग्राहकांना 7 मार्च 2021 पर्यंतच क्रोमा डॉट कॉम या संकेतस्थळावर किंवा कोणत्याही क्रोमा आउटलेटवर या विलक्षण ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या नवीन उपक्रमाविषयी क्रोमाचे सीएमओ रितेश घोषाल यांनी आनंद व्यक्त केला. एक ब्रँड म्हणून अॅपलला आपल्या इको सिस्टीमचा अभिमान आहे. ग्राहकांना विनाव्यतय आणि सहज या उपक्रमाशी जोडले जावे, या हेतूने आम्ही इको सिस्टीम तयार केली आहे. अॅपलच्या खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांसाठी क्रोमा हे पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे. परंतु आम्हाला असे वाटते कि अॅपलच्या विविध वैशिष्ट्यांचे अद्याप म्हणावे तितके कौतुक झालेले नाही. आमच्या नवीन उपक्रमामुळे अॅपल, क्रोमा आणि ग्राहक हे एकमेकांशी जोडले जातील. त्याचा आमच्या ग्राहकांना फायदा होईल, असे क्रोमाचे सीएमओ घोषाल यांनी सांगितले. (Buy Apple products before March 7 on Chroma, get 10 percent discount)

इतर बातम्या

फोन घ्यायचा विचार करताय? हा फोन तब्बल 10 हजारांनी स्वस्त!

Car Maintenance | या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार