Car Maintenance | या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार

Car Maintenance | या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार (avoiding these five mistakes will make your car run longer)

Car Maintenance | या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार
या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार

मुंबई : आजकाल स्वतःची कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. बरेच जण आर्थिक क्षमतेनुसार कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्णही करतात. काही लोकांची कार बर्‍याच वर्षे धावते, तर काही लोक यात भाग्यवान नसतात. बरेच लोक कारच्या मेंटेनन्सचा खर्च वाढला की तिची विक्री करतात. तुम्ही जर कमी खर्चात तुमची कार वर्षानुवर्षे सुस्थित ठेवू इच्छित असाल तर आज आम्ही आपल्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या मदतीने आपण छोट्या चुका टाळू शकता आणि आपली कार दीर्घकाळ टिकवू शकता. (avoiding these five mistakes will make your car run longer)

इंधन लाईट वॉर्निंग

जर तुमची कार लाल ऑईल लाईटचा इशारा देत असेल तर तिला चालवू नका. याचा अर्थ तुमच्या कारमधील इंधन संपत आले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या कारचे इंजिन सुरक्षित ठेवायचे असेल तर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका, ज्यामुळे तुमची कार सुरक्षित राहिल.

कमी इंधनावर गाडी चालविणे

आपल्या वाहनाचे इंधन नेहमी 40 टक्के असावे. जर हे त्याहून कमी झाले आणि तरीही आपण प्रवास सुरू ठेवला तर एक वेळ येईल जेव्हा इंधन पूर्णपणे कमी होते. यामुळे आपल्या इंधन इंजेक्टरमध्ये कचरा शिरतो आणि नंतर आपल्या कारचे नुकसान होऊ शकते.

कारला गंज येणे

तुमच्याकडे मर्सिडीज कार असो किंवा टाटा. प्रत्येक वाहनात गंज येतेच. जर ड्रायव्हरच्या साईडला फुटवेलला गंज लागला असेल तर ते त्वरीत बदलून घ्या. अन्यथा या गंजमुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. आपल्या कारचे नियमित सर्व्हिसिंग करा.

चुकीचे इंधन भरणे

पेट्रोल पंपवर इंधन भरत असताना नेहमी लक्ष ठेवा, तुमच्या गाडीत पेट्रोल भरले जात आहे की डिझेल. कारण बऱ्याचदा आपले लक्ष नसते आणि गाडीत चुकीचे इधन भरले जाते. असे झाल्यास गाडीचे इंजिन पूर्णपणे खराब होऊ शकते.

देखभालीकडे दुर्लक्ष करणे

प्रत्येक कारला कालांतराने देखभाल आवश्यक असते. अशा परिस्थितीत, जर आपण ते विसरलात किंवा ते पूर्ण केले नाही तर आपली कार फार लवकर खराब होऊ शकते. म्हणूनच, इंजिन ऑईल, वेळोवेळी गाडीचे सर्व्हिसिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. (avoiding these five mistakes will make your car run longer)

इतर बातम्या

वैद्यकीय शिक्षण विभागातील नोकरभरतीला स्थगिती, तुमची बाजू मांडा, कोर्टाचे सरकारला आदेश

आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण’