AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chat GTP : नोकरी करता करता तुम्ही या पाच प्रकारे करू शकता चाट जीटीपीवरून कमाई

ChatGPT हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे. या सर्च इंजिनवर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अगदी अचूकपणे मिळते. त्याची ही गुणवत्ता गुगलपेक्षा वेगळी आहे.

Chat GTP : नोकरी करता करता तुम्ही या पाच प्रकारे करू शकता चाट जीटीपीवरून कमाई
ओपन AIImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 09, 2023 | 4:42 PM
Share

मुंबई : चाट जीटीपी (ChatGPT) वापरणाऱ्याचे प्रमाण आता बऱ्यापैकी वाढलेले आहे. एखाद्याला मेल लिहिणे असो किंवा मुलाच्या शाळेसाठी निबंध लिहिणे असो, चाट जीटीपीचे अनेक उपयोग आहेत. यासोबतच तुम्ही याद्वारे पैसेही कमवू शकता. ChatGPT हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे. या सर्च इंजिनवर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अगदी अचूकपणे मिळते. त्याची ही गुणवत्ता गुगलपेक्षा वेगळी आहे. जरी लाखो लोकांनी हे प्रगत AI टूल वापरले असेल, तरीही काही लोकं असतील ज्यांना काहीच माहिती नसेल. येथे आम्ही तुम्हाला असे 5 मार्ग सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला पैसे कमावता येतील. या सर्व गोष्टी चाट जीटीपी वापरून करता येतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

कन्टेन्ट रायटींग आणि ब्लॉगिंग

तुम्ही चाट जीटीपी वापरून उच्च दर्जाच्या ब्लॉग पोस्ट आणि लेख लिहू शकता. तुम्ही कोणत्याही कंपनी, वेबसाइट किंवा ब्लॉगमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता आणि पैसे कमवू शकता. त्याच वेळी, तुम्ही तुमची वेबसाइट तयार करू शकता आणि त्यावर चाट जीटीपीद्वारे सामग्री फाइल करू शकता.

कॉपीरायटिंग आणि मार्केटिंग

एखाद्या कंपनीसोबत भागीदारी करून, तुम्ही त्यांच्यासाठी अॅडव्हरटाझींग आणि जाहिराती देखील तयार करू शकता. हे काम चॅटजीपीटीच्या माध्यमातूनही करता येते. यातूनही तुम्ही पैसे कमवू शकता.

शिक्षणासाठी

अभ्यास मार्गदर्शक, प्रश्न उत्तरे आणि स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही चाट जीटीपी वापरू शकता. इथून तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही मुलांना शिकवू शकता ज्यात तुम्हाला मदत होईल.

सोशल मीडिया व्यवस्थापन

आजकाल लोक सोशल मीडियावरून खूप पैसे कमावत आहेत. तुम्ही ChatGPT वापरून सोशल मीडिया पोस्ट, मथळे तसेच प्रतिसाद तयार करू शकता. हे आपल्या पोस्टला चालना देण्यासाठी मदत करेल.

भाषा अनुवाद

अनेक लोक भाषांतराचे काम करून घेतात आणि त्यासाठी चांगले पैसे देतात. तुम्ही चाट जीटीपी वापरून वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करू शकता. यासोबत तुम्हाला चांगले पैसेही मिळतील.

अशा प्रकारे बनवा अकाउंट

  • ChatGPT वापरण्यासाठी, तुम्ही प्रथम Google Chrome किंवा Mozilla Firefox मध्ये chat.openai.com उघडणे आवश्यक आहे. यानंतर, येथे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबरसह लॉग इन करा.
  • आता तुम्हाला तुमचे प्रोफाइल नाव येथे टाकावे लागेल.
  • यानंतर New Chat वर टॅप करा.
  • येथे तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विचारू शकता. याच्या प्रतिसादात, तुम्हाला Google सारख्या 10 लिंक्स मिळणार नाहीत तर एक अचूक उत्तर मिळेल.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.