AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या टिप्स फॉलो करून रील्स पाहण्याची सवय करा कमी

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर रील्स पाहण्यात बराच वेळ घालवतात. परंतु कधीकधी आपण रील्स पाहण्यात इतके मग्न होतो वेळेचं भान राहत नाही. अशातच तासंतास रिल्स पाहण्याची सवय सोडायची असेल तर आजच्या लेखात सांगितलेल्या या टिप्स फॉलो करून तुम्ही ही सवय कमी करू शकता.

या टिप्स फॉलो करून रील्स पाहण्याची सवय करा कमी
reels
| Edited By: | Updated on: Jul 09, 2025 | 1:59 PM
Share

आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. आपण कुठेही असलो, समजा घरी असो, ऑफिस असो किंवा प्रवासात असो, आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूब आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर नक्कीच करतो. अशातच या सोशल मीडियाचा वापर करत असताना आपण सर्वजण रील्स पाहत असतो. एखाद्या व्यक्तीचे मनोरंजन करण्यासाठी किंवा कोणतीही माहिती जलद पोहोचवण्यासाठी रील्स हे एक माध्यम आहे. मात्र आजकाल हे छोटे व्हिडिओ क्लिप्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कारण रील्स पाहत असताना वेळेचे भान राहत नाही आणि आपण तासंतास व्हिडिओ पाहत असतो. या सवयीमुळे हळूहळू वेळ वाया जाऊ शकतो आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होऊ शकतो. म्हणून, या सवयीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु बरेच लोकं दररोज विचार करतात की ते उद्यापासून रील्स पाहणे कमी करतील. परंतु असे क्वचितच घडते. जर तुम्हालाही तासंतास रील्स पाहण्याची सवय सोडायची असेल तर यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

वेळ निश्चित करा

आपल्यापैकी बहुतेक जण फक्त 5 मिनिटांचा विचार करून रील्स पाहण्यास सुरुवात करतात आणि त्यात बराच वेळ वाया जातो हे समजतच नाही, म्हणून सर्वप्रथम एक विशिष्ट वेळ मर्यादा निश्चित करा. तुम्ही फोन वापरण्यासाठी किंवा रील्स पाहण्यासाठी वेळ ठरवू शकता, जसे की दररोज फक्त 15 ते 20 मिनिटे रील्स पाहा.

नोटिफिकेशन्स बंद करा

सोशल मीडिया अॅप्सवरील नोटिफिकेशन्स सतत तुमचे लक्ष वेधून घेतात. यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमधील सोशल मीडियावरील नोटिफिकेशन्स बंद करा. जसे की जर तुमचा मित्र तुमच्यासोबत रील शेअर करत असेल तर तुम्ही पुन्हा रील पाहण्यास मग्न होतात. म्हणून नोटिफिकेशन्स बंद करा जेणेकरून तुम्ही विनाकारण अॅप पुन्हा पुन्हा उघडू नये.

पुस्तक वाचण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रित करा

रील्स पाहण्याऐवजी पुस्तके वाचणे, चित्रकला करणे, फिरायला जाणे किंवा गाणी ऐकणे यासारख्या काही सकारात्मक सवयी अंगीकारा. यामुळे तुम्हाला बरे वाटेल आणि काहीतरी नवीन शिकण्यास मदत होईल. जर तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी नवीन आणि मनोरंजक केले तर हळूहळू रील्स पाहण्याची सवय कमी होण्यास मदत होईल.

डिजिटल डिटॉक्स करा

आठवड्यातून एक दिवस असा निवडा जेव्हा तुम्ही सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहाल. याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. तुम्ही जो दिवस निवडता तेव्हा तुम्ही मोबाईलपासून दूर राहाल आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह फिरायला जा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा.

स्वतःला प्रश्न विचारा

जेव्हा जेव्हा तुम्ही रील्सवर रील पाहत असताना वेळ घालवता तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की रील्स पाहून तुम्ही तुमचं धैर्य साध्य करत येईल का? तुम्ही जितके जास्त रील्स पहाल तितका कमी वेळ तुम्ही तुमच्या इतर कामांना देऊ शकाल. जसे की जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर अर्धा तास किंवा एक तास रील्स पाहण्याऐवजी तो वेळ अभ्यासात घालवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.