Tesla लाँच करणार ह्युमनॉइड रोबोट, कारपेक्षाही कमी असणार किंमत?

| Updated on: Aug 18, 2022 | 1:22 PM

टेस्ला कंपनीतर्फे लवकरच एक रोबोट लाँच करण्यात येणार आहे. हा कोणताही सामान्य रोबोट नसेल तर तो ह्युमॅनॉइड असेल, असे टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.

Tesla लाँच करणार ह्युमनॉइड रोबोट, कारपेक्षाही कमी असणार किंमत?
Tesla लाँच करणार ह्युमनॉइड रोबोट
Image Credit source: Twitter
Follow us on

Tesla Humanoid Robot: रोबोट, स्पेस आणि इंटरनेट याबद्दल टेस्लाचे (Tesla) प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांना वाटणारे आकर्षण नवे नाही. त्यांनी आत्तापर्यंत कार, इंटरनेट आणि स्पेसमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता हेच एलॉन मस्क लवकरच एक रोबोट लाँच करण्याच्या तयारीत आहेत. विशष म्हणजे हा कोणताही सामान्य रोबो नसून तो ह्युमनॉइड असेल. टेस्ला कंपनी त्यांच्या पहिल्या ह्युमॅनॉइडचा प्रोटोटाइप (Tesla Humanoid Prototype) या वर्षी लाँच करण्याची योजना आखत असल्याचे एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे. या वर्षातील आठवा महिना अर्धा उलटून गेला आहे. वर्ष संपायला अवघे चार महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत टेस्ला कंपनीचा ह्युमॅनॉइड लाँच आता फारसे दूर नसेल. ह्युमॅनॉइड हा शब्द ह्युमन आणि ॲंड्रॉईड असे दोन शब्द मिळून बनला आहे. म्हणजेच ह्युमॅनॉइड हा कोणताही साधासुधा रोबोट नसेल तर तो माणसासारखा दिसणारा असेल. आपण अनेक सिनेमांमध्ये ह्युमॅनॉइडस पाहिले असतील, एलॉन मस्कही अशाच एखाद्या रोबोबद्दल सांगत आहेत. मस्क यांनी चायना सायबरस्पेस (China Cyberspace) या मासिकासाठी एक लेख लिहीला असून त्यामध्येच त्यांनी ह्युमॅनॉइड संदर्भात माहिती शेअर केली आहे.

पुढील काळात लोक गिफ्ट म्हणून रोबोट्स देतील –

भविष्यात, दशकभरानंतर त्यांच्या पालकांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून रोबोट भेट देतील, असा दावा मस्क यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात या यंत्रमानवांची अथवा रोबोट्सची किंमत ही एखाद्या कारपेक्षाही कमी असू शकेल, असे मतही मस्क यांनी व्यक्त केले आहे. या लेखामध्ये एलॉन मस्क यांनी SpaceX आणि Neuralink यासह इतर अनेक उपक्रमांबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्यांनी bipedal humanoid robot संदर्भातील काही तपशीलही शेअर केले.

कधी येणार टेस्लाचा हा नवा रोबो?

टेस्ला कंपनी या वर्षात पहिल्या ह्युमॅनॉइडचा प्रोटोटाइप लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रोबोट्सची बुद्धिमत्ता अधिक सुधारावी हेही कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. ह्युमॅनॉइड रोबोट्सची उपयुक्तता स्पष्ट झाल्यानंतर त्यांच मागणी निश्चित वाढेल व त्यांचे उत्पादन वाढवावे लागेल, असा विश्वासही मस्क यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

किती असेल ह्युमॅनॉइड रोबोची किंमत ?

भविष्यात ह्युमॅनॉइड रोबोची किंमत एखाद्या कारपेक्षाही कमी असेल असा अंदाज मस्क यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही काळात लोक वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून रोबोटच भेट देतील, असा दावा त्यांनी केला. मस्क यांनी आजकालच्या कार्सना स्मार्ट वेब कनेक्टेड रोबोट म्हटले आहे. स्वत:ला एक (चांगला) माणूस बनवणे, हेच भविष्यात आपल्यासाठी अतिशय कठीण काम असेल असा मुद्दा मस्क यांनी मांडला.

मस्क तयार करत आहेत 1000 स्टारशिप्स –

भविष्यात, मेंदूच्या होणाऱ्या दुखापती बऱ्या करणे हा, Neuralinkच्या मेंदू- मशीन इंटरफेसचा उद्देश असल्याचे मस्क यांनी सांगितले. त्याच्या मदतीने स्पायनल आणि मानसिक विकार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. तर SpaceX बद्दल बोलत असताना मस्क यांनी सांगितले की, कंपनी 1000 स्टारशिप्स तयार करणार आहे, ज्याद्वारे लोकांना मंगळावर घेऊन जाता येईल. कंपनीने 79 रॉकेट्सचा यशस्वीरित्या पुनर्वापर केला असल्याचेही मस्क यांनी नमूद केले.