एलन मस्कचा ट्विट बॉम्ब!, 20% ट्विटर अकाऊंट फेक; 44 बिलियन डॉलर वरुन यू-टर्न!

ट्विटर खरेदीसाठी 44 बिलियन डॉलर रक्कम देण्यावरुनही मस्कने यू-टर्न घेतला आहे. फेक अकाउंट बाबत अधिकृत पुराव्यासहित स्पष्टीकरण दिल्याशिवाय प्रस्ताव मार्गी लागणार नसल्याची भूमिका मस्कने घेतल्यामुळे ट्विटर-मस्क खरेदीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एलन मस्कचा ट्विट बॉम्ब!, 20% ट्विटर अकाऊंट फेक;  44 बिलियन डॉलर वरुन यू-टर्न!
इलन मस्क Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 5:25 PM

मुंबई : आघाडीचं समाजमाध्यम ट्विटरच्या खरेदीवरुन दिवसागणिक नवे अपडेट समोर येत आहे. ट्विटरवरील फेक अकाउंटच्या (Fake Account) संख्येचं ट्विटर-मस्क खरेदी डीलवरील सावट गहिर होत चाललं आहे. ट्विटरने वर्तविलेला 5 टक्क्यांपेक्षा कमी फेक अकाउंटचा दावा एलन मस्कने (Elon Musk) फेटाळून लावला आहे. ट्विटरवरील वास्तविक फेक अकाउंट 20 टक्के असल्याचा दावा मस्कने केला आहे. ट्विटर खरेदीसाठी 44 बिलियन डॉलर रक्कम देण्यावरुनही मस्कने यू-टर्न घेतला आहे. फेक अकाउंट बाबत अधिकृत पुराव्यासहित स्पष्टीकरण दिल्याशिवाय प्रस्ताव मार्गी लागणार नसल्याची भूमिका मस्कने घेतल्यामुळे ट्विटर-मस्क खरेदीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ट्विटरवरील फेक अकाउंटचा अंदाज लावणे कठिण आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यपद्धती नाही. फेक अकाउंटची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी बाब असल्याच्या मस्कच्या विधानानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये (Twitter shares) घसरण झाली आहे.

तात्पुरता ‘ब्रेक’

जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचा सर्वेसर्वा एलन मस्कने ट्विटर खरेदीची घोषणा केली होती. ट्विटरच्या खरेदीसाठी एलन मस्क यांनी विविध 19 गुंतवणुकदारांकडून 7 अरब डॉलर म्हणजे 50 हजार कोटी रुपयांची उभारणी केली आहे. ट्विटर खरेदी व्यवहार तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

खरे किती, खोटे किती?

ट्विटरवर 29 कोटीहून अधिक यूजर्स आहेत. यापैकी 5 टक्के यूजर्स स्पॅम किंवा बनावट असल्याचे ट्विटरने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. एलन मस्क यांच्या ट्विटर खरेदीच्या निर्णयानंतर माध्यम वर्तृळात वेगवान घडामोडी घडत आहेत.

व्यवहार अरबो डॉलरचा!

एलन मस्क यांनी यांनी ट्विटर खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आतापर्यंत 50 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. इतकचं नव्हे सौदी किंग यांनी मस्क यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित 3.5 कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शविली आहे. ट्विटर खरेदीचा व्यवहार 44 अरब डॉलरचा आहे.

ट्विटरची व्याप्ती

ट्विटर हे आघाडीचं सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट मानली जाते. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करुन संवाद साधता येतो. ट्विटरवरील मजकुराला ट्वीट म्हटलं जातं. ट्विटरवर 280 अक्षरांपर्यंतची मर्यादा आहे. ट्विटरचा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात. ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात. ट्विटरच्या लोगोमधील पक्षी लैरी नावानं जगविख्यात आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.