नवीन हेडफोन खरेदी करताय? मग ‘या’ टीप्स नक्की फॉलो करा

अक्षय चोरगे

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 8:02 AM

हेडफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रवासाच्या दगदगीपासून ऑफिसपर्यंत किंवा अगदी मित्रांपासून ऑनलाईन लेक्चरपर्यंत सर्वच ठिकाणी हेडफोन फार उपयोगी पडतात.

नवीन हेडफोन खरेदी करताय? मग 'या' टीप्स नक्की फॉलो करा
Follow us

मुंबई : हेडफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रवासाच्या दगदगीपासून ऑफिसपर्यंत किंवा अगदी मित्रांपासून ऑनलाईन लेक्चरपर्यंत सर्वच ठिकाणी हेडफोन फार उपयोगी पडतात. हल्ली वायरपासून ते वायरलेस हेडफोनही बाजारात पाहायला मिळतात. प्रवासात किंवा रात्री अपरात्री एखादा चित्रपट पाहताना इतरांना त्रास होऊ नये म्हणून सर्वचजण हेडफोनचा वापर करतात. पण हेडफोन खरेदी करताना त्यातून येणारा आवाज, त्याचा आकार, किंमत हे फार महत्त्वाचे असते. मात्र हेडफोन घेताना त्यासोबतच खालील गोष्टींचीही काळजी घेतली तर तुम्हाला उत्तम हेडफोन मिळू शकतात. (Everything You Need To Know Before Buying A Headphone for regular uses)

या टीप्स नक्की फॉलो करा

  • हेडफोन घेतेवेळी तुम्हाला सर्वप्रथम कोणता हेडफोन हवाय, कशासाठी हवाय याचा विचार करा. त्यानंतर विकत घ्या.
  • तुम्हाला कानात फिट बसणारा (इअरबड) हेडफोन हवाय की कानावर बसणारे हेडफोन हवेत, याचीही माहिती घ्या.
  • हेडफोन विकत घेतेवेळी त्याचा सर्वाधिक वापर कधी होणार आहे, हे पाहिले पाहिजे.
  • जर तुम्ही प्रवासात हेडफोनचा जास्त वापर करणार असाल, तर‘इअरबड’ हेडफोन चांगले मानले जातात.
  • तर घरातील म्युझिक सिस्टीमवरून गाणी ऐकण्यासाठी ‘ऑनइअर’ किंवा ‘ओव्हर इअर’ हेडफोन उपयुक्त ठरतात.
  • हेडफोनमधून गाणी ऐकताना शक्यतो आवाज कमी ठेवा.
  • कमी आवाज ठेवल्याने तुमच्या कानाला काहीही इजा होत नाही.
  • आवाज मोठा करूनच संगीत व्यवस्थित ऐकता येत असेल तर अशा हेडफोन काही काळानंतर त्रासदायक ठरु शकतात.
  • हेडफोन कानाला लावल्यानंतरही आजूबाजूचा आवाजच जास्त येत असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही.
  • हेडफोनची फ्रिक्वेन्सी पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 10 हार्ट्झपासून 25 हजार हार्ट्झदरम्यानची फ्रिक्वेन्सी असलेले हेडफोन केव्हाही चांगले समजले जातात.

इतर बातम्या

हेडफोनचे नेमके किती प्रकार असतात? जाणून घ्या सर्वकाही

डेस्कटॉपवरील वायफायचा पासवर्ड शोधायचाय? मग ही ट्रिक नक्की वापरा

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI