फ्लिपकार्टमध्ये मोठी गडबड, विक्री न होताच सर्व वस्तू आऊट ऑफ स्टॉक

प्रोडक्ट आऊट ऑफ स्टॉक (Out of Stock) असणं त्या कंपनीसाठी एक चांगली आणि फायदेशीर गोष्ट मानली जाते.

फ्लिपकार्टमध्ये मोठी गडबड, विक्री न होताच सर्व वस्तू आऊट ऑफ स्टॉक
फ्लिपकार्ट
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 5:56 PM

मुंबई : कोणत्याही दुकानात किंवा ई-कॉमर्स साईटवर एखादी वस्तू आऊट ऑफ स्टॉक (Out of Stock) असेल तर त्याचा अर्थ कंपनीचे सर्व प्रोडक्ट्स विकले गेले आहेत. कोणत्याही कंपनीसाठी ही एक चांगली आणि फायदेशीर गोष्ट असते. परंतु फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटवर वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली आहे. (Flipkart Year End Sale : All products out of stock without being sold)

फ्लिपकार्ट (Flipkart) च्या वेबसाईटवर मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता सर्व प्रोडक्ट्स आऊट ऑफ स्टॉक (Out of Stock) दिसत होते. ग्राहक हे नोटिफिकेशन पाहून आश्चर्यचकित झाले. दरम्यान फ्लिपकार्टवरील या वस्तू स्टॉकमध्येच होत्या. केवळ एक तांत्रिक गडबड झाल्याने साईटवर Out of Stock चं नोटिफिकेशन दिसत होतं. काही वेळानंतर हा टेक्निकल एरर दुरुस्त करण्यात आला. परंतु इअर एंड सेलच्या आशेने फ्लिपकार्टवर शॉपिंग करायला आलेल्या अनेक ग्राहकांना निराश होत इतर ई-कॉमर्स साईटकडे मोर्चा वळवावा लागला.

नव्या वर्षानिमित्त फ्लिपकार्टचा नवा सेल

Flipkart ने महिन्याभरापूर्वी दिवाळीनिमित्त सेल आयोजित केला होता. या सेलमध्ये लोकांनी कोट्यवधी वस्तूंची खरेदी केली. या शॉपिंग फेस्टिव्हल्सदरम्यान स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स देऊन मोबाईल्सची रेकॉर्डब्रेक विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टने नुकताच इलेक्ट्रॉनिक सेल (Flipkart Electronics Sale 2020) सादर केला होता त्यालादेखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनी आता नव्या वर्षानिमित्त नवीन सेल घेऊन येत आहे. कंपनीने 1 ते 3 जानेवारीदरम्यान FlipStart Days Sale 2021 चे आयोजन केले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना गॅजेट्स, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप आणि घरगुती साहित्यावर अनेक मोठमोठ्या ऑफर्स सादर केल्या आहेत.

हेडफोन्सवर 70 टक्के सूट

फ्लिपकार्टच्या या न्यू ईयर सेलमध्ये घरगुती साहित्यावर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. सोबतच लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, स्पीकर, कॅमेरा आणि अन्य साहित्यावरही सूट देण्यात आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, लॅपटॉप्सवर 20 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. स्मार्टवॉचची किंमत 1,299 रुपयांपासून असेल. हेडफोन्स आणि स्पीकर्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

घरगुती साहित्यावरही डिस्काऊंट

फ्लिपकार्ट डेज सेलमध्ये EMI, एक्सटेंडेड वॉरंटी आणि एक्सचेंज ऑफर्ससारखे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने जाहीर कले आहे की, फ्लिपकार्ट डेज सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि अन्य घरगुती साहित्यावर मोठ्या ऑफर्स दिल्या आहेत. वायरलेस इयरफोन आणि स्मार्टफोन्स नव्या वर्षात योग्य किंमतीत विकले जातील.

ICICI बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के सूट

फ्लिपकार्ट कंपनी नव्या सेलपूर्वी आज टीव्ही आणि अन्य साहित्यावर मोठ्या ऑफर्स देत आहे. या ऑफर्स 31 डिसेंबरपर्यंत लागू असतील. फ्लिपकार्ड डेज सेलदरम्यान कंपनीने आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिड कार्ड ग्राहकांसाठी ईएमआयद्वारे वस्तू खरेदी केल्यास इन्स्टंट 10 टक्के डिस्काऊंट देऊ केला आहे. त्यामुळे तुम्ही येत्या काळात नवी स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा अन्य साहित्य खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने चांगली संधी देऊ केली आहे.

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

Best of 2020 : यावर्षी लाँच झाले ‘हे’ ढासू स्मार्टफोन्स, 108MP कॅमेरासह शानदार फिचर्स

Year Ender 2020 : 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेले टॉप 5 स्मार्टफोन्स

(Flipkart Mobile Year End Sale : All products out of stock without being sold)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.