UPI मनी ट्रान्सफर आणि PhonePe वर ऑफलाईन-ऑनलाईन पेमेंटची सुविधा मिळणार मोफत, कंपनीने केले स्पष्ट

कंपनीने सांगितले की, PhonePe मोबाईल रिचार्जसाठी ट्रायल करीत आहे, जिथे वापरकर्त्यांच्या छोट्या ग्रुपकडून 51-100 रुपयांच्या रिचार्जसाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जसाठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क घेतले जात आहे.

UPI मनी ट्रान्सफर आणि PhonePe वर ऑफलाईन-ऑनलाईन पेमेंटची सुविधा मिळणार मोफत, कंपनीने केले स्पष्ट
UPI मनी ट्रान्सफर आणि PhonePe वर ऑफलाईन-ऑनलाईन पेमेंटची सुविधा मिळणार मोफत
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 4:18 PM

मुंबई : भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe ने UPI मनी ट्रान्सफर, ऑफलाइन, ऑनलाइन पेमेंटसाठी आकारल्या जाणार्‍या प्रक्रिया शुल्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. PhonePe ने मंगळवारी स्पष्ट केले की त्यांच्या पेमेंट अॅपवरील सर्व UPI मनी ट्रान्सफर, ऑफलाइन आणि ऑनलाइन पेमेंट (UPI, वॉलेट, क्रेडिट आणि डेबिट कार्डवर) सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहेत आणि ते सुरू राहतील. कंपनीने सांगितले की PhonePe या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही आणि भविष्यातही असे करणार नाही. (Free offline-online payment on UPI Money Transfer and PhonePe, The company made it clear)

कंपनीने सांगितले की, PhonePe मोबाईल रिचार्जसाठी ट्रायल करीत आहे, जिथे वापरकर्त्यांच्या छोट्या ग्रुपकडून 51-100 रुपयांच्या रिचार्जसाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जसाठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क घेतले जात आहे. कंपनीने पुढे सांगितले की, हे शुल्क सर्व पेमेंट स्रोत (upi, वॉलेट, क्रेडिट आणि डेबिट कार्ड) वापरकर्त्यांसाठी लागू आहे. एवढेच नाही तर 50 रुपयांपेक्षा कमीचे ​​रिचार्ज पूर्णपणे मोफत आहे.

प्रीपेड मोबाईल रिचार्जवर 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक

बिल पेमेंटसाठी, PhonePe क्रेडिट कार्ड पेमेंटवर शुल्क आकारते आणि हे आता एक उद्योग मानक आहे. कंपनीने अलीकडेच प्रीपेड मोबाइल रिचार्जवर 50 रुपयांपर्यंत कॅशबॅकचे आश्वासन दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की PhonePe अॅपद्वारे रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना 51 रुपयांपेक्षा जास्त तीन प्रीपेड मोबाइल रिचार्ज पूर्ण केल्यावर खात्रीशीर कॅशबॅक मिळेल.

PhonePe चे 300 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते

PhonePe चे 325 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. या अॅपद्वारे वापरकर्ता पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो, मोबाईल रिचार्ज करू शकतो, डीटीएच, डेटा कार्ड, स्टोअरमध्ये पेमेंट करू शकतो, आवश्यक पेमेंट करू शकतो, सोने खरेदी करू शकतो आणि गुंतवणूक करू शकतो.

भारतातील 22 दशलक्ष व्यापारी दुकानांमध्ये वापरले जाते PhonePe

PhonePe ने 2017 मध्ये गोल्ड लॉन्च करून फायनान्स सेवेत प्रवेश केला, जो वापरकर्त्यांना 24-कॅरेट सोने सुरक्षितपणे त्याच्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्याचा एक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय देतो. प्लॅटफॉर्म भारतातील 22 दशलक्षाहून अधिक व्यापारी आउटलेटवर देखील स्वीकारले गेले आहे. (Free offline-online payment on UPI Money Transfer and PhonePe, The company made it clear)

इतर बातम्या

Video: गाडीतून उतरला आणि थेट 11 वाघांच्या कळपात गेला, पुढं जे झालं त्याने नेटकरी आवाक, चीनमधला व्हिडीओ व्हायरल

Hair Care : गरोदरपणानंतर केस गळतीमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.