Mobile Rate : काय सांगता…! फक्त 729 रुपयांपासून मोबाईल… कस शक्य आहे?

जर तुम्ही बेसिक फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हजार रुपयांपेक्षाही कमी किमतींमध्ये नोकियापासून ते सॅमसंगपर्यंतचे बेस्ट फिचर्स असलेले फोन बाजारात उपलब्ध आहे. या लेखातून काही मोबाईल फोनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Mobile Rate : काय सांगता...! फक्त 729 रुपयांपासून मोबाईल... कस शक्य आहे?
व्हायरल मेसेजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 10:55 AM

मुंबई : हल्लीच्या जमान्यात पाचशे अन्‌ हजार रुपयात कुठे फोन येतो का? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. परंतु हे वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, की नोकिया, सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्यांचेही फोन तुम्ही हजार रुपयांपेक्षा कमी किमतींमध्ये खरेदी करुन शकतात. विशेष म्हणजे बेसिक मोबाईल (basic mobiles) फोनमध्ये येणारे सर्व फिचरदेखील यात आहेत. जर तुम्ही नवीन बेसिक मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. या मोबाईलची सुरुवातीची किंमत ही केवळ 729 रुपये इतकी आहे. कमी किमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स (specifications) या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात. ज्या लोकांना अद्याप स्मार्टफोनचा वापर करता येत नाही त्या लोकांसाठी हे मोबाईल अगदी ‘परफेक्ट’ आहेत. ग्राहकांना यात, क्लासिक लूक, ड्यूअल सिम, रेडियो, कॅमेरा, ब्लुटूथ, आदी विविध फिचर्स (features) मिळत आहे. जाणून घेउया या मोबाईल बद्दल…

1. आयकल के3310 ड्युअल सिम कीपॅड मोबाईल

आयकल के3310 ड्युअल सिम मोबाईल फोन केवळ 729 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये कॅमेरा, रेडिओ, ब्लुटूथ, म्यूझिक प्लेअर, टॉर्च आदी सुविधा मिळतात. याचा डिसप्ले 4.57 इंची आहे. याचे रिझॉल्यूशन 128 बाय 160 पिक्सल आहे. यात 32 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. 1000 मेगाहर्ट बॅटरी आहे.

2. नोकिया 110 ड्यूअल सिम

नोकियाचा हा फोन 1699 रुपयांमध्ये अमॅझोनवर खरेदी करु शकतात. यात ड्यूअल सिम सपोर्ट आहे. हा मोबाईल नोकिया सिरीज 30 प्लसवर आधारीत आहे. याचा डिसप्ले 1.77 इंची आहे. फोनमध्ये रिअर कॅमेरा, रेडिओ आणि म्यूझिक प्लेअरच्या सुविधा आहेत. याच्या स्टोरेजला 32 जीबीपर्यंत वाढवले जाउ शकते. यात 800 मेगाहर्ट बॅटरी आहे. एक वेळा चार्ज झाल्यावर 18.5 दिवस स्टँडबाय राहू शकतो.

3. सॅमसंग गुरु म्यूझिक

सॅमसंग मोबाईलच्या बेसिक मॉडेलमधील हा फोन आहे. याला 2 इंचाचे टीएफटी डिसप्ले आहे. हा फोन अमेझॉनवर 2060 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात, रेडिओ, म्यूझिक प्लेअरदेखील उपलब्ध आहे. या मोबाईलमध्य कॅमेरा आणि ब्लुटूथची सुविधा नाही मिळणार. याच्या स्टोरेजला एसडी कार्डच्या माध्यमातून 16 जीबीपर्यंत वाढवता येउ शकते. हा फोन 800 मेगाहर्ट बॅटरीसोबत उपलब्ध आहे.

4. मोटो ए10 रोज गोल्ड

मोटोरोलाचा हा फीचर फोन अतिशय चांगला पर्याय आहे. मोटो ए10 गोल्डची स्टोरेज कॅपेसिटी 32 जीबी आहे. याचे वैशिष्टय म्हणजे हा फोन मीडियाटेक पोसेसरवर चालतो. याची 1750 मेगाहर्टची बॅटरी युजर्सना अधिक मजबूत शक्ती देते. कंपनीच्या दाव्यानुसार याची साउंड क्वालिटीही जबरदस्त आहे. ऑनलाईन खरेदी केल्यास याची किंमत 1349 इतकी आहे.

संबंधित बातम्या  :

Gold in Mobile Phones : जुना ‘फोन’ फेकण्याआधी हे लक्षात घ्या…. तुमच्या ‘स्मार्टफोन’ मध्ये आहे, खरं सोनं ..!

iPhone : ‘ॲपल’ आणू शकतो, पहिला ‘पोर्टलेस आयफोन? सत्य की अफवा… जाणून घ्या, संपूर्ण माहिती

‘वन प्लस’चा हा स्मार्टफोन फक्त पाच 5 मिनिटांत 50 टक्के होईल चार्ज; जाणून घ्या Oneplus Ace ची किंमत, वैशिष्टये!

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.