PUBG: New State मध्ये नवं अपडेट, हॅक्स वापरणाऱ्या, चीटिंग करणाऱ्या युजर्सवर कारवाई

| Updated on: Nov 23, 2021 | 9:40 PM

गेम डेव्हलपर कंपनी क्राफ्टनने सांगितले आहे की, ते PUBG New State गेममध्ये नवीन बदल करणार आहेत, जे हॅकर्सपासून गेमचे संरक्षण करण्यासाठी आणि गेमच्या माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी अँटी-चीटिंग अपडेट्स जारी करेल.

PUBG: New State मध्ये नवं अपडेट, हॅक्स वापरणाऱ्या, चीटिंग करणाऱ्या युजर्सवर कारवाई
Follow us on

PUBG New State Update: भारतात नुकत्याच लाँच झालेल्या PUBG न्यू स्टेट (PUBG New State) या गेमबाबत एक नवीन अपडेट आले आहे. गेम डेव्हलपर कंपनी क्राफ्टनने सांगितले आहे की, ते गेममध्ये नवीन बदल करणार आहेत, जे हॅकर्सपासून गेमचे संरक्षण करण्यासाठी आणि गेमच्या माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी अँटी-चीटिंग अपडेट्स जारी करेल. (Krafton introduced anti-cheating measures in PUBG New State for Android users)

नवीन अपडेट सध्या अँड्रॉइड युजर्ससाठी आणले आहे. येत्या काळात, ते लवकरच iOS साठी देखील रोलआऊट केले जाईल. गेल्या वर्षी PUBG मोबाईलवर भारतात बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर कंपनीने बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया हे PUBG चे भारतीय व्हर्जन भारतात लॉन्च केले होते. त्यानंतर अलीकडेच कंपनीने PUBG: New State हा गेमदेखील लाँच केला आहे. हा गेम पबजीचं नवं व्हर्जन असल्याचे मानले जात आहे.

PUBG: New State प्लेयर्सना मिळणार स्पेशल कंपनसेशन

दरम्यान, असे सांगण्यात आले आहे की, यूजर्स त्यांच्या डिव्हाइसवर अपडेट इन्स्टॉल केल्याशिवाय गेम खेळू शकणार नाहीत. क्राफ्टनने एका ब्लॉग पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. कंपनीने या अपडेट अंतर्गत खेळाडूंना स्पेशल कंपनसेशन देण्याची घोषणाही केली आहे. गेम अपडेट केल्यानंतर, खेळाडूंना बक्षीस म्हणून तीन चिकन मेडल दिले जातील.

जे युजर्स अपडेटच्या माध्यमातून पुढे जाण्याचा पर्याय निवडतील त्यांना Google Play Store वर रीडायरेक्ट केले जाईल. हा गेम डाउनलोड करण्यासाठी अँड्रॉईड यूजर्स गुगल प्ले स्टोअरवर जाऊ शकतात. हा गेम खेळण्यासाठी Google Play Store उघडा. Install पर्यायावर क्लिक करा. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह साइन अप करा आणि गेम खेळण्यास सुरुवात करा.

कंपनीच्या मते, नवीन गेमचा उद्देश खेळाडूंकडून फसवणूक करण्याच्या पद्धती ओळखणे आणि त्या कमी करणे हा आहे. चुकीच्या पद्धती किंवा हॅक वापरून फसवणूक करणाऱ्या गेमरवर कंपनी बंदी घालू शकते.

1 कोटीहून अधिक डाऊनलोड्स

PUBG New State मोबाईल गेम 11 नोव्हेंबरला लाँच करण्यात आला आणि एका दिवसात या बॅटल रॉयल गेमला Google Play Store वर एकूण 1 मिलियन म्हणजेच 10 लाखांहून अधिक डाउनलोड मिळाले. दरम्यान, आतापर्यंत या गेमने 1 कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पार केला आहे. तसेच बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया या गेमने 5 कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पार केला आहे. अनेक युजर्सनी हा गेम प्री-रजिस्टर केला होता. ज्यामुळे अॅपला परवानगी देणार्‍या युजर्सच्या डिव्हाइसवर गेम ऑटो-डाउनलोड झाला.

PUBG New State चे वैशिष्ट्य

PUBG New State 2050 च्या टाइमलाइनवर आधारित आहे आणि यात PUBG मोबाइल किंवा BGMI पेक्षा चांगले ग्राफिक्स आणि गेम-प्ले आहे. या नवीन मोडमध्ये अनेक वाहने, ड्रोन आणि इतर गोष्टींना एलईडी लॅम्प बसवण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 4 मॅप्स देण्यात आले आहेत. नवीन गेममध्ये चांगले वेपन कस्टमायझेशन, नवीन वाहने, ड्रोन शॉप आणि इतर कंटेंट समाविष्ट करण्यात आला आहे.

Team Deathmatch Mode : यामध्ये नवीन स्टेशन मॅप पर्याय असेल. अनेक क्रेट्स आणि रखडलेल्या ट्रेनचे डब्बे आहेत. यामध्ये तुम्हाला गेम खेळायचे आहेत. हा मॅप फाईटसाठी आहे. यामध्ये दूरपर्यंत मारा करणाऱ्या रायफल्स क्वचितच पाहायला मिळतील. हा गेम केवळ 10 मिनिटे खेळता येतो. यामध्ये 40 किलिंग करणारा विजेता असेल.

गेल्या वर्षी PUBG मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पबजी हा गेम या वर्षी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया या नावाने भारतात लाँच करण्यात आला. Android युजर्स Google Play Store वरून हे दोन्ही गेम डाउनलोड करू शकतील, तर iPhone वापरकर्त्यांना Apple App Store वर जावे लागेल.

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

(Krafton introduced anti-cheating measures in PUBG New State for Android users)