OnePlusचा नवा स्मार्टफोन येतोय, 3 ऑगस्टला होणार लॉंच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

 वनप्लसचा नवा स्मार्टफोन वनप्लस 10टी 5 जी, 3 ऑगस्टला बाजारात लॉंच होणार आहे. मात्र त्यापूर्वी मोबाईलचे तपशील लीक झाले आहेत. चीनमध्ये हा फोन यह वनप्लस एस प्रो नावाने बाजारात येणार आहे.

OnePlusचा नवा स्मार्टफोन येतोय, 3 ऑगस्टला होणार लॉंच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन
one plus Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 12:16 PM

स्मार्टफोनच्या बाजारातील महत्वपूर्ण ब्रँड असलेला वनप्लस हा त्यांचा नवा स्मार्टफोन (Smart Phone) वनप्लस 10टी 5जी, 3 ऑगस्टला (3rd August) बाजारात लॉँच करणार आहे. मात्र त्यापूर्वीच या फोनचे फीचर्स आणि इतर तपशील (Features of Smartphone) लीक झाले आहेत. चीनमध्ये हा फोन यह वनप्लस एस प्रो नावाने तर जागतिक बाजारात या स्मार्टफोनचे नाव 10टी असेल. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने लॉंचिगपूर्वीच स्मार्टफोनची माहिती शेअर करण्यास सुरूवात केली आहे. या फोनमध्ये हेजेलब्लाड कॅमेरा सेटअप किंवा साईड बेजेल वर अलर्ट स्लायटरची सुविधा नसेल. वनप्लसच्या या लवकरच येणाऱ्या ‘वनप्लस 10टी’ या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉक चे फ्लॅगशिप प्रोसेसर सुपरड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. त्यासह बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपही आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

oneplus 10t 5g smartphoneचे स्पेसिफिकेशन्स

प्राइस बाबाने टिप्सटर इशान अगरवाल याच्यासह वनप्लस 10टी 5जी च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा प्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे. त्यामध्ये 2,412×1,080 पिक्सल रेझोल्यूशन, 10 बिट कलर्स एसआरजीबी कलर गेमट आणि एचडीआर 10 प्लसचा सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे उत्तम Viewing Experience मिळतो.

oneplus 10t 5g smartphoneचा कॅमेरा सेटअप

वनप्लस 10टी 5जी च्या कॅमेरा विभागाबद्दल सांगायचे झाले तर, त्यामध्ये बॅक पॅनेलवर 50 मेगापिक्सेचलचा सोनी आयएमएक्स सेन्सर पहायला मिळेल. त्यासह ओआयएस सपोर्टही आहे. यामध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड ॲंगल लेन्स असून त्यामुळे 120 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर होतो. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या oneplus 10t 5g smartphoneची रॅम साईज

वनप्लस 10टी 5जी फोनमधील रॅम व स्टोरेज बद्दल आत्तापर्यंत दोन गोष्टी समोर आल्या आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळू शकेल. तर दुसऱ्या लीकनुसार, फोनमध्ये 16 जीबीपर्यंत रॅम आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळू शकेल.

oneplus 10t 5g smartphoneची किंमत किती ?

वनप्लस 10टी 5जी मोबाइलची सुरूवातीची किंमत 49,999 रुपये असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये बेस व्हेरियंट असेल. या किमतीत 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असेल. तर टॉप व्हेरियंटची किंमत 66,999 रुपये असेल.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.