गुगलवर ‘या’ दोन गोष्टींसाठी सर्वाधिक सर्चिंग

गुगलवर 'या' दोन गोष्टींसाठी सर्वाधिक सर्चिंग

नवी दिल्ली : आज जगभरात सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जातो. लोक कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी गुगल या सर्च इंजिनचा वापर करतात. दरम्यान 2018 मध्ये भारतीयांनी गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्या याबाबतच अहवाल नुकतंच गुगलने प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतीय लोक डेटिंग आणि लग्न या दोन गोष्टी सर्वाधिक सर्च करतात असे स्पष्ट झाले आहे.

सध्या जगभरात अनेक डेटिंग साईट्स उपलब्ध झाल्या आहेत. या डेटिंग साईटचा वापर अनेकदा पार्टनर शोधण्यासाठी केला जातो. यानुसार गुगलद्वारे डेटिंग साईटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लग्न जुळवणाऱ्या मेट्रोमेनियल साईट्स सर्च करणाऱ्यांच्या संख्येत केवळ 13 टक्के वाढ झाली आहे. गुगलने दिलेल्या या रिपोर्टवरुन भारतील लोक विवाहबंधनात अडकण्यापेक्षा डेटिंगवर जाणे जास्त पसंत करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

गिफ्टस आणि रोमँटिक डिनरही सर्च

विशेष म्हणजे डेटिंगनंतर सर्वाधिक सर्च केलेल्या शब्दामध्ये गिफ्टस आणि रोमॅंटिक डिनर या दोन शब्दांचा समावेश आहे. गुगलवर 24 टक्के भारतीयांनी प्रेम कसे व्यक्त करावे हे सर्च केले आहे. त्यानंतर 21 टक्के भारतीयांनी रोमँटिंक डिनर हा शब्द सर्च केला आहे. तर तब्बल 34 टक्के भारतीय लोकांनी पार्टनरला कोणते गिफ्ट द्यावेत हे सर्च केलं आहे. याशिवाय गुगलवर भारतीयांनी ब्यूटी टिप्स, डेटिंग, हॉबी, यांसह विविध गोष्टीही सर्च केल्या आहेत.

भारतात इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणारा देश म्हणून सध्या भारताची ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय गुगलवर हिंदीमध्ये सर्च करणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. लॅपटॉप, मोबाईल फोन याद्वारे हिंदीत सर्च करणाऱ्या लोकांची संख्या गेल्यावर्षात दुप्पट झाली आहे. अशी माहिती गुगलचे राष्ट्रीय निदेशक विकास अग्निहोत्री यांनी दिली आहे.

निअर मी

जवळचे सिनेमागृह, कॉफी शॉप, हॉटेल, एटीएम यांसारख्या इतर आवश्यक गोष्टीही भारतीय गुगलवर शोधत असतात. यात सर्वाधिक सर्च इन्शुरन्स कंपनी, ब्यूटी पार्लर आणि टूर्स आणि ट्रॅव्हल्स याबाबत सर्च केल आहे.

Published On - 4:30 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI