दिवाळीनिमित्त गुगल वनचे खास गिफ्ट फक्त 11 रुपयांमध्ये मिळवा 2 टीबी स्टोअरेज, असा घ्या ऑफरचा लाभ

या दिवाळीत गुगलने ग्राहकांसाठी एक उत्तम क्लाउड स्टोरेज ऑफर लाँच केली आहे. गुगल वन अंतर्गत, कंपनी फक्त 11 रूपये प्रति महिना किमतीत 2TB पर्यंत क्लाउड स्टोरेज देत आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे, तर या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आजच्या लेखात जाणून घेऊयात...

दिवाळीनिमित्त गुगल वनचे खास गिफ्ट फक्त 11 रुपयांमध्ये मिळवा 2 टीबी स्टोअरेज, असा घ्या ऑफरचा लाभ
google storage
| Edited By: | Updated on: Oct 20, 2025 | 9:42 PM

दिवाळी सणानिमित्त अनेक दूकानांमध्ये तसेच ई-कॉमर्स साईटवर देखील वस्तू खरेदीवर आकर्षक ऑफर्स ग्राहाकांसाठी देत असतात. अशातच आता दिवाळीच्या या सणानिमित्त गुगल वनने देखील ग्राहाकांसाठी उत्तम ऑफर लाँच केलेली आहे. तर गुगल त्यांच्या क्लाउड स्टोरेज सेवेवर एक खास ऑफर देत आपल्या ग्राहकांना दिवाळी भेट देत आहे. या मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत कंपनी फक्त 11 रूपयांमध्ये 2TB पर्यंत स्टोरेज खरेदी करण्याची उत्तम संधी देत ​​आहे. या गुगल ऑफरचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

गुगल वन प्लॅनची ​​किंमत

गुगल वन लाईट प्लॅन: या प्लॅनची ​​किंमत दरमहा 30 रूपये आहे, परंतु पहिल्या तीन महिन्यांसाठी तुम्ही हा प्लॅन फक्त 11रूपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनी या प्लॅनसह तुम्हाला 30 जीबी स्टोरेज देईल.

गुगल वन बेसिक प्लॅन: या प्लॅनची ​​किंमत दरमहा 130 रुपये आहे आणि त्यात 100 जीबी स्टोरेज आहे, परंतु सध्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा प्लॅन तीन महिन्यांसाठी 11रुपयांमध्ये प्रति महिना या किमतीत खरेदी करू शकता.

गुगल वन स्टँडर्ड प्लॅन: 200 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या प्लॅनची ​​किंमत दरमहा 210 रुपये आहे, परंतु आता तुम्ही हा प्लॅन तीन महिन्यांसाठी 11 रुपये दरमहा खरेदी करू शकता.

गुगल वन प्रीमियम प्लॅन: 2 टीबी स्टोरेज असलेल्या या प्लॅनची ​​किंमत दरमहा 650आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या या खास ऑफरचा लाभ घेत 11 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. तीन महिन्यांनंतर या प्लॅनची ​​किंमत दरमहा 650 रूपये असेल.

गुगल वन दिवाळी ऑफर: ऑफर कशी सक्रिय करावी

Google One अ‍ॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर जा आणि तुमच्या Gmail खात्याने साइन इन करा.

वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मेनू आयकॉनवर क्लिक करा.

येथे तुम्हाला मेंबरशिप प्लॅनचा पर्याय दिसेल.

तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार प्लॅन निवडा.

यानंतर Get Discount वर क्लिक करा.

पेमेंटची पडताळणी करा, त्यानंतर डिस्काउंट प्लॅन सक्रिय करण्यासाठी सबस्क्राइबर वर टॅप करा.