Google Pay वापरणाऱ्यांसाठी ‘वाईट बातमी’, आता या पेमेंटवर भरावे लागणार शुल्क
तुम्हीही Google Pay वापरत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता गुगल पेने वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, हे शुल्क कोणत्या प्रकारच्या पेमेंटवर घेतले जाईल? हे जाणून घेऊयात.

आजकाल प्रत्येक जण ऑनलाईन पेंमेटचा वापर करत आहे.अशातच ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढंल आहे. यात अनेक सुविधा उपलब्ध असल्याने आपण मोबाईल रिचार्ज पासून ते वीज बील पर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार phone pay, Google payच्या UPI ने करत असतो. अशातच तुम्ही सुद्धा घरातील वीज बिल भरण्यासाठी Google Pay वापरत असाल तर आता तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. UPI आता बिल भरण्यापर्यंत अनेक सेवा देणाऱ्या ॲप्सचा ग्राहकांवर बोजा वाढू लागला आहे. कारण प्रत्येकाने बिल पेमेंटसाठी सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, Google Pay देखील या शर्यतीत मागे नाही कारण आता Google ने देखील वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
आता तुम्हाला या सेवांसाठी पैसे द्यावे लागतील
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही बिल पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्याकडून 0.5 टक्के ते 1 टक्के शुल्क घेतला जाईल, या शुल्काव्यतिरिक्त तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल. लक्षात ठेवा की आतापर्यंत Google Pay ने बिल पेमेंटसाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले नाही. सध्या Google Pay ने सुविधा शुल्काबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मोबाईलद्वारे कोणतेही बिल भरल्यास लागणार शुल्क
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, गुगल पे एक वर्षापूर्वीच मोबाईलद्वारे कोणतेही बिल ऑनलाईन पद्धतीने भरल्यास शुल्कासाठी वापरकर्त्यांकडून 3 रुपये सुविधा शुल्क आकारत आहे. अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तेव्हा ॲपने वापरकर्त्याकडून 15 रुपये सुविधा शुल्क आकारले. हे शुल्क ॲपमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क म्हणून दाखवले जात आहे ज्यात GST देखील समाविष्ट आहे.
UPI व्यवहारांवरही शुल्क आकारले जाईल का?
Google Pay द्वारे UPI व्यवहारांवरील शुल्काबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ग्लोबल सर्विस फर्म PwC च्या मते, स्टॉकहोल्डर्स यांना UPI टान्झॅक्शन व्यवहार प्रक्रियेत 0.25 टक्के खर्च करावा लागतो. आता असे दिसते की हे खर्च भागवण्यासाठी, फिनटेक कंपन्या नवीन महसूल मॉडेल्सचा अवलंब करत आहेत. आतापर्यंत UPI व्यवहार पूर्णपणे मोफत आहे, UPI वर शुल्क आकारण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत सरकारने ते मोफत ठेवले आहे.
