AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google कडून MacBook वापरकर्त्यांना महत्त्वाचा अलर्ट, अपडेट न केल्यास होऊ शकते मोठी चूक

तुमचं MacBook अजूनही Big Sur वर चालू आहे का? जर हो, तर निर्णय घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण तुम्ही जितका उशीर कराल, तितका धोका वाढत जाईल. त्यामुळे युजर्सने आता काय करायला हवं? चला, जाणून घेऊया...

Google कडून MacBook वापरकर्त्यांना महत्त्वाचा अलर्ट, अपडेट न केल्यास होऊ शकते मोठी चूक
macbook
| Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 2:40 PM
Share

जर तुम्ही अजूनही तुमच्या MacBook मध्ये macOS Big Sur वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. Google ने स्पष्ट इशारा दिला आहे की आता ते macOS Big Sur वर Chrome ब्राउजरसाठी सपोर्ट पूर्णपणे थांबवत आहेत. म्हणजेच, जर तुमचा Chrome ब्राउजर Version 138 पेक्षा पुढे गेला, तर तुम्हाला कोणतेही नवे अपडेट्स, फीचर्स, परफॉर्मन्स सुधारणा किंवा सिक्युरिटी पॅच मिळणार नाहीत.

ही एक मोठी धक्का देणारी बातमी आहे कारण याचा थेट परिणाम जगभरातील लाखो MacBook यूजर्सवर होणार आहे, जे अजूनही Big Sur वर काम करत आहेत.

आता नाही मिळणार Chrome अपडेट्स

Google ने जाहीर केलं आहे की Chrome चा Version 138 हे macOS 11 Big Sur साठी शेवटचं अपडेट असणार आहे. त्यानंतर युजर्सना कोणतेही नवे अपडेट्स मिळणार नाहीत. यामध्ये महत्त्वाचे सिक्युरिटी पॅच, नवीन फीचर्स आणि परफॉर्मन्स सुधारणांचा समावेश आहे.

आता ही अपडेट्स न मिळाल्यामुळे तुमचा ब्राउजर मालवेअर, फिशिंग अटॅक्स, हॅकिंग आणि इतर ऑनलाइन सायबर जोखमांपासून असुरक्षित होणार आहे.

Apple ने आधीच सपोर्ट थांबवला

Google चा हा निर्णय काहीसा अपेक्षितच होता, कारण Apple ने देखील आधीच macOS Big Sur साठी अधिकृत सपोर्ट बंद केला आहे. त्यामुळे Google सुद्धा आपल्या Chrome ब्राउजरसाठी या OS वर सुरक्षितता आणि योग्य कामगिरीची हमी देऊ शकत नाही.

युजर्सने काय करावं?

जर तुम्हाला सुरक्षित ब्राउजिंग अनुभव हवा असेल, तर लगेचच तुमचा MacBook कमीत कमी macOS 12 Monterey वर अपडेट करणे अत्यावश्यक आहे. परंतु अनेक जुन्या मॉडेल्समध्ये हे शक्य नसेल, त्यामुळे नवीन MacBook Air किंवा MacBook Pro मध्ये अपग्रेड करणं ही जास्त योग्य आणि शहाणपणाची गोष्ट ठरेल.

कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

  • जर तुमचं बजेट मर्यादित असेल, तरी सध्या M2 चिपसह MacBook Air वर चांगल्या ऑफर्स चालू आहेत.
  • M1 चिपसह MacBook मॉडेल्स सुद्धा काही काळासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतात.
  • जर तुम्ही Windows OS वापरण्याचा विचार करत असाल, तर Windows 11 लॅपटॉप्स देखील उत्तम पर्याय आहेत. ते Chrome साठी अप-टू-डेट सपोर्ट देतात आणि त्यात Copilot AI असिस्टंट सारखे आधुनिक फिचर्स देखील उपलब्ध आहेत.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.