ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक तुमच्या स्मार्टफोनमध्ये घेण्यासाठी काय कराल?

नवी दिल्ली : वाहन चालक प्रवासादरम्यान नेहमीच आपल्या वाहनाची कायदेशीर कागदपत्रे विसरतात. त्यामुळे वाहतूक पोलीस तपासणी करताना ड्रायव्हिंग लायसन्स सादर न करु शकल्याने दंडही आकारतात. वाहनाशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे अनेकदा जोखमीचेही असते. यावर उपाय म्हणून सरकारने ‘mParivahan’ हे अधिकृत अॅप तयार केले आहे. ‘mParivahan’ या अॅपच्या मदतीने वाहनचालक आपले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि ड्रायव्हिंग […]

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक तुमच्या स्मार्टफोनमध्ये घेण्यासाठी काय कराल?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : वाहन चालक प्रवासादरम्यान नेहमीच आपल्या वाहनाची कायदेशीर कागदपत्रे विसरतात. त्यामुळे वाहतूक पोलीस तपासणी करताना ड्रायव्हिंग लायसन्स सादर न करु शकल्याने दंडही आकारतात. वाहनाशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे अनेकदा जोखमीचेही असते. यावर उपाय म्हणून सरकारने ‘mParivahan’ हे अधिकृत अॅप तयार केले आहे.

‘mParivahan’ या अॅपच्या मदतीने वाहनचालक आपले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि ड्रायव्हिंग लायसन्ससारखी कागदपत्रे स्मार्टफोनमध्ये डिजिटल स्वरुपात ठेऊ शकतात. हे अॅप अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही ऑपरेटींग सिस्टमसाठी उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाउनलोड करता येईल. त्यानंतर अॅपमध्ये नोंदणी करणेही आवश्यक आहे.

अॅपची वैशिष्ट्ये

‘mParivahan’ या अॅपवरील डिजीटल कागदपत्रेदेखील मुळ कागदपत्रांप्रमाणेच वैध मानली जातील. त्यांची स्वतंत्रपणे वैधताही तपासता येईल. वाहतूक पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यास तुम्ही त्यांना स्मार्टफोनवरील वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) दाखवू शकता. या अॅपच्या मदतीने डिजीटल लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी गाडीचा नोंदणी क्रमांक आणि मुळ ड्रायव्हिंग लायसन्स होणे आवश्यक आहे. तसेच जन्म दिनांकही सांगावा लागेल.

‘mParivahan’ अॅपवर डिजीटल आरसी डाऊनलोडची प्रक्रिया

  •  ‘mParivahaan’ अॅप उघडा.
  •  टॉप राईट कॉर्नरवर क्लिक करा.
  •  तेथे Sign in ऑप्शनवर क्लिक करा आणि आपला मोबाईल क्रमांक टाका.
  • मोबाईलवर एसएमएसने आलेला व्हेरिफिकेशन कोड टाका.
  • आता अॅपच्या होमस्क्रीनवर जाऊन RC वर क्लिक करा.
  • सर्च टॅबमध्ये गाडीचा नोंदणी क्रमांक टाका आणि सर्च करा.
  • अॅप रजिस्ट्रेशन क्रमांकाशी जोडलेली माहिती ऑटोमॅटीकली दिसेल.
  • ‘Add to dashboard’ वर क्लिक करा आणि RC समाविष्ट करा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.