AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा जबरदस्त स्मार्टफोन; 6,000mAh बॅटरी आणि फीचर्सची रेलचेल

6,000mAh Battery Smartphone : मोबाईलवर गेमिंग, इंटरनेटचा भडिमार आहे. त्यामुळे सध्या जास्त पॉवर बॅकअप स्मार्टफोनची मागणी आहे. 6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी आहे. तुमचे बजेट 15,000 रुपये असेल तर या कंपन्यांचे स्मार्टफोन तुम्ही सहज खिशात मिरवू शकता.

15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा जबरदस्त स्मार्टफोन; 6,000mAh बॅटरी आणि फीचर्सची रेलचेल
स्वस्तात दमदार फोन
| Updated on: Oct 31, 2024 | 4:20 PM
Share

भारत हा जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन मार्केटपैकी एक आहे. देशात तुम्हाला प्रत्येक रेंज आणि प्रकारचे स्मार्टफोन मिळतील. स्मार्टफोन आता आपल्या आयुष्याचा खास भाग झाले आहेत. मोबाईलवर गेमिंग, इंटरनेटचा भडिमार आहे. त्यामुळे सध्या जास्त पॉवर बॅकअप स्मार्टफोनची मागणी आहे. 6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची (6000mAh Battery Smartphone Under 15000) संधी आहे. त्यासाठी तुमच्याकडे 15,000 खिशात असायला हवेत. काही प्लॅटफॉर्मवर तर तुम्ही हप्त्यावर पण हे स्मार्टफोन मिळवू शकता.

6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन बाजारात

Samsung Galaxy M35 5G : हा स्मार्टफोन 6.6 इंचाच्या डिस्प्लेसह मिळतो. यामध्ये 50 MP + 8 MP + 2 MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येतो. हा फोन ग्राहक 14,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Vivo T3X : विवो टी3एक्समध्ये 6000mAh बॅटरी मिळते. 6.72 इंचाचा डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये आहे. याशिवाय 50 MP + 2 MP चा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. 6000mAh बॅटरीसह ग्राहकांना फ्लॅश चार्जिंग सपोर्ट देण्यात येतो. हा स्मार्टफोन ग्राहकांना 12,228 रुपयांना मिळतो.

Moto G64 : मोटोरोला जी64 स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 7025 चिपसेटच्या पॉवरसह मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 50 MP + 8 MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. 6000mAh बॅटरीसह येणारा हा फोन टर्बो चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह मिळतो. या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.

iQOO Z9x : आयक्यू जेड9एक्समध्ये 6.72 इंचाचा डिस्पेल मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटसह येतो. यामध्ये 50 MP + 2 MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये फ्लॅश चार्जिंगचा पर्याय आहे. आयक्यू आयफोन ग्राहकांना 12,499 रुपयांना मिळतो.

POCO X3 : पोको एक्स 3 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 732G चिपसेटसह मिळतो. यामध्ये 6.67 इंचचा डिस्प्ले आणि 64 + 13 + 2 + 2 MP क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये ग्राहकांना 6000mAh ची बॅटरी मिळते. यामध्ये क्विक चार्जिंगचा पर्याय मिळतो. हा स्मार्टफोन ग्राहकांना 13,150 रुपयांना खरेदी करता येईल.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...