AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honor ची धमाका ऑफर, स्मार्टफोन्सवर सहा हजारांची सूट

मुंबई : चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Huawei ची सहाय्यक कंपनी Honor ने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर स्पेशल सूट दिली आहे. या सेलची सुरुवात 7 मार्चच्या मध्य रात्रीपासून होणार असून 8 मार्चपर्यंत हा सेल असणार आहे. यादरम्यान Honor 9N आणि Honor 7A यासोबतच इतर स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला […]

Honor ची धमाका ऑफर, स्मार्टफोन्सवर सहा हजारांची सूट
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Huawei ची सहाय्यक कंपनी Honor ने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर स्पेशल सूट दिली आहे. या सेलची सुरुवात 7 मार्चच्या मध्य रात्रीपासून होणार असून 8 मार्चपर्यंत हा सेल असणार आहे. यादरम्यान Honor 9N आणि Honor 7A यासोबतच इतर स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला या सेलचा लाभ घेता येणार आहे.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्सवर सूट तर मिळणारच आहे, त्यासोबतच नो कॉस्ट इएमआयचं ऑप्शनही मिळणार आहे. इतकंच नाही तर अॅक्सिस बँक, एचडीफसी बँक, आयसीआयसाआय बँक आणि एसबीआय बँकेचं डेबिट कार्ड असणाऱ्यांनाही हे ऑप्शन देण्यात आले आहे. म्हणजे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तरी तुम्ही तुमच्या डेबिट कार्डवर इएमआय बांधून मोबाईल खरेदी करु शकता.

या स्मार्टफोन्सवर सूट मिळणार

Honor 9N : या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा फोन तुम्हाला 8,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. याच स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटला 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतो.

Honor 9 Lite : या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 6000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.  सेल दरम्यान हा फोन तुम्हाला 7,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर याच्या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटला 10,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Honor 7A : या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे. पण या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांमध्ये मिळणार आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...