8000mAh बॅटरी, स्टायलस सपोर्ट आणि इतर वैशिष्टयांसह Infinix Xpad Edge झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Infinix Xpad Edge 4G आणि वायफाय कनेक्टिव्हिटीसह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. या टॅबलेटमध्ये आणखीन कोणते खास फिचर्स आहेत ते आजच्या या लेखातून आपण जाणून घेऊयात.

8000mAh बॅटरी, स्टायलस सपोर्ट आणि इतर वैशिष्टयांसह Infinix Xpad Edge झाला लाँच, जाणून घ्या किंमत
Infinix Xpad Edge
Image Credit source: Infinix
| Edited By: | Updated on: Dec 20, 2025 | 3:53 AM

इन्फिनिक्स कंपनीने ग्राहकांसाठी Infinix Xpad Edge 4G हा नवीन टॅबलेट लाँच करण्यात आला आहे. हा नवीन अँड्रॉइड टॅबलेट सेल्युलर (4G) आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. तर या टॅबलेटबद्दल बोलायचे झाले तर, यात 2.4K रिझोल्यूशन डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पॉवरफुल 8000mAh बॅटरी आहे. या नवीन इन्फिनिक्स टॅबलेटमध्ये कीबोर्ड आणि स्टायलस देखील देण्यात येईल. यात इन्फिनिक्सचा एआय-आधारित फोलॅक्स व्हॉइस असिस्टंट, तसेच चांगल्या आवाजासाठी क्वाड स्पीकर्स समाविष्ट आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी हा टॅबलेट 4G आणि वाय-फाय दोन्ही कनेक्टिव्हिटी देतो.

इन्फिनिक्स एक्सपॅड एज स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: अँड्रॉइड 15 वर चालणाऱ्या या टॅबलेटला दोन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळतील. यात 13.2-इंचाचा 2.4K डिस्प्ले आहे ज्यामध्ये 450 निट्स पीक ब्राइटनेस आणि 3.2 आस्पेक्ट रेशो आहे. डिस्प्लेला TÜV राइनलँडकडून फ्लिकर-फ्री आणि लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन असल्याचा दावा केला जातो.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा टॅबलेट स्नॅपड्रॅगन 685 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तर हा नवीन टॅबलेट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो.

कॅमेरा सेटअप: या टॅबमध्ये एकच 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

इन्फिनिक्स एक्सपॅड एजमध्ये WPS ऑफिस प्री-इंस्टॉल केलेले आहे. शिवाय यामध्ये स्प्लिट स्क्रीन आणि फोन कास्ट सारखी फिचर्स देखील देते आणि X Keyboard 20 आणि X Pencil 20 शी सुसंगत आहे. हे AI चे युग आहे, म्हणून कंपनीने ग्राहकांसाठी या टॅबलेटमध्ये AI फीचर्स देखील समाविष्ट केले आहेत, ज्यामध्ये AI लेखन, हाय ट्रान्सलेशन आणि AI स्क्रीन ओळख यांचा समावेश आहे.

इन्फिनिक्स एक्सपॅड एज किंमत

हा इन्फिनिक्स ब्रँडेड टॅबलेट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. मलेशियामध्ये या व्हेरिएंटची किंमत 1299 RM म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 28 हजार रुपये आहे. हा टॅबलेट फोन एकाच सेलेस्टियल इंक रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. हा टॅबलेट भारतीय बाजारात लाँच होईल की नाही हे सध्या माहित नाही.