iPhone 17: पाकिस्तानात आयफोन 17 ची किंमत ऐकून हैराण व्हाल, इतक्या रुपयात तर…
भारताचा शेजारी आणि भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची किंमत किती आहे? ही किंमत ऐकून पाकिस्तानी नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

iPhone 17 Price in Pakistan: Apple चा नवीन iPhone 17 Series खरेदीसाठी भारतात मोठी गर्दी उसळली आहे. पहिल्या दिवशी तर रात्रीपासून लोक ॲप्पल स्टोरसमोर मुक्कामी होते. आयफोन चाहत्यांमध्ये झटापट सुद्धा दिसली. लाखापेक्षा अधिक किंमतीचा हा स्मार्टफोन खिशात ठेवण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केलेली आहे. आयफोनची भारतातच नाही तर शेजारील पाकिस्तानमध्ये पण तुफान क्रेझ आहे. भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची किंमत किती आहे? ही किंमत ऐकून पाकिस्तानी नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
iPhone 17 Price in Pakistan vs iPhone 17 Price in India
ॲप्पल पाकिस्तान डॉट कॉमने तिथल्या आयफोन 17 ची किंमत किती याची माहिती दिली आहे. या फोनच्या 256 जीबी आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत क्रमश: पाकिस्तानी रुपयात 325,000 (जवळपास 1,02,014 रुपये) आणि पाकिस्तानी रुपयात 394,500 (जवळपास 1,23,830 रुपये) इतकी आहे. तर भारतातील आयफोन 17, 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 82,900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 1,02,900 रुपये आहे.
iPhone 17 Pro Price in Pakistan vs iPhone 17 Pro Price in India
ॲप्पल पाकिस्तान डॉट कॉमनुसार, या फोनच्या 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी व्हेरिएंटची किंमत क्रमश: पाकिस्तानी 440,500 रुपये (जवळपास 1,38,268 रुपये), पाकिस्तानी 509,500 रुपये (जवळपास 1,59,927 रुपये) आणि पाकिस्तानी 578,500 रुपये (जवळपास1,81,585 रुपये) आहे. तर दुसरीकडे भारतात 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबीच्या टॉप व्हेरिएंटसाठी 1,34,900 रुपये, 1,54,900 रुपये आणि 1,74,900 रुपये खर्च करावे लागतात.
iPhone Air Price in Pakistan vs iPhone Air Price in India
ॲप्पल पाकिस्तान डॉट कॉमनुसार, आयफोन 17 एअरची किंमत देण्यात आली आहे. या फोनच्या 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी व्हेरिएंटची किंमत क्रमश: PKR 398,500 (जवळपास 1,25,085 रुपये), PKR 467,500 (जवळपास 1,46,744 रुपये) आणि PKR 536,500 (जवळपास 1,68,402 रुपये) इतकी आहे. तर दुसरीकडे भारतात या फोनच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये, 1,39,900 रुपये आणि 1,59,900 रुपये आहे.
iPhone 17 Pro Max Price in Pakistan vs iPhone 17 Pro Max Price in India
ॲप्पल पाकिस्तान डॉट कॉमनुसार, iPhone 17 Pro Max साठी 256 जीबी, 512 जीबी, 1 टीबी आणि 2 टीबी टॉप व्हेरिएंटची किंमत क्रमश: PKR 473,000 (जवळपास 1,48,470 रुपये), PKR 542,000 (जवळपास 1,70,128 रुपये), PKR 611500 (जवळपास1,91,944 रुपये) आणि PKR 748,500 (जवळपास 2,34,947 रुपये) इतकी आहे. तर भारतात 256 जीबी, 512 जीबी, 1 टीबी आणि 2 टीबी टॉप व्हेरिएंटची किंमत1,49,900 रुपये, 1,69,900 रुपये, 1,89,900 रुपये आणि 2,29,900 रुपये इतकी आहे.
