JBL ने टचस्क्रीन आणि पॉवरफूल ANC सह नवीन प्रीमियम ट्रू वायरलेस इअरबड्स केले सादर, जाणून घ्या किंमत
JBL ने भारतात त्यांचे नवीन प्रीमियम ट्रू वायरलेस इअरबड्स, JBL Live Buds 4 आणि Live Beam 4 लाँच केले आहेत. हे इअरबड्स टचस्क्रीन डिस्प्ले असलेली स्मार्ट चार्जिंग केस, हाय-रेस ऑडिओ आणि पॉवर ANC सारख्या वैशिष्ट्यांसह येतात. चला तर मग या इअरबड्सची किंमत जाणून घेऊयात.

जेबीएलने भारतीय बाजारपेठेत त्यांचे नवीन प्रीमियम ट्रू वायरलेस इअरबड्स सादर केले आहेत. कंपनीने त्यांना JBL Live Buds 4 आणि JBL Live Beam 4 या नावांनी भारतात सादर केले आहे. यावेळी कंपनीने केवळ साउंड गुणवत्तेवरच नव्हे, तर वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.
या नवीन इअरबड्ससोबत येणाऱ्या स्मार्ट चार्जिंग केसमध्ये आता टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यामुळे फोन बाहेर न काढता अनेक महत्वाचे फिचर्स नियंत्रित करणे सोपे होईल. चला तर मग आधी या बड्सची किंमत आजच्या लेखात जाणून घेऊयात
किंमत आणि उपलब्धता
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, JBL Live Buds 4 आणि JBL Live Beam 4 या दोन्हींची किंमत 24 हजार 999 रुपये आहे. हे इअरबड्स आजपासून JBL इंडियाच्या वेबसाइटवर, प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये आणि मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.
Live Buds 4 हे इअरबड्स Black, Blue, Silver आणि Sand रंगांमध्ये खरेदी करता येतील. तर Live Beam 4 हे Blue, Green, Silver, Orange, Purple आणि Sand रंगांमध्ये उपलब्ध आहे.
JBL Live Buds 4 सिरीजची फिचर्स
JBL Live 4 सिरीजचे सर्वात उल्लेखनीय फिचर्स म्हणजे तिची नवीन स्मार्ट चार्जिंग केस, जी JBL Smart OS 3.0 वर चालते. या केसमध्ये एक मोठी टचस्क्रीन आहे. या स्क्रीनद्वारे तुम्ही नोटिफिकेशन्स पाहू शकता, EQ प्रीसेट्स बदलू शकता, म्युझिक ट्रॅक्स स्किप करू शकता, शॉर्टकट्स कस्टमाइझ करू शकता आणि केसची बॅकग्राउंडसुद्धा कस्टमाइझ करू शकता. यामुळे तुमचा स्मार्टफोन वारंवार अनलॉक करण्याची गरज नाहीशी होते.
हाय-रेस ऑडिओ आणि पॉवरफूल एएनसी
या सिरीजमधील दोन्ही इअरबड्समध्ये 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स असून ते हाय-रेस ऑडिओ प्रमाणित आहेत.
या बड्समध्ये JBL स्पॅशियल साउंड, पर्सोनी-फाय 3.0, पर्सनल साउंड अॅम्प्लिफिकेशन आणि लो व्हॉल्यूम EQ सारखी ॲडव्हान्स ऑडिओ फिचर्स देखील आहेत.
या बड्समध्ये ट्रू अॅडॅप्टिव्ह नॉईज कॅन्सिलिंग 2.0 हे फिचर्स देखील आहे. एका नवीन अल्गोरिदमच्या मदतीने हे बड्स पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे सभोवतालचा आवाज कमी करू शकतात, ज्यामुळे तुमचा गाणं ऐकण्याचा आणि कॉलिंगचा अनुभव सुधारतो.
एआयमुळे कॉलिंग अधिक चांगले होईल
शिवाय, कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी बड्सच्या दोन्ही मॉडेल्समध्ये सहा मायक्रोफोन आहेत. बड्समध्ये परफेक्ट कॉल्स 2.0, एआय-आधारित नॉईज रिडक्शन, कॉल इक्वेलायझर आणि साऊंड लेव्हल ऑप्टिमायझर यांसारखी फिचर्स देखील आहेत. यामुळे गर्दीच्या किंवा गोंगाटाच्या ठिकाणीही अधिक स्पष्ट आवाज येईल.
बॅटरी लाईफ आणि फास्ट चार्जिंग सुद्धा
इअरबड्सच्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास JBL Live Buds 4 हे ANC चालू असताना 32 तासांपर्यंत आणि ANC बंद असताना 40 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देतात. तर JBL Live Beam 4 हे ANC चालू असताना 40 तासांपर्यंत आणि ANC बंद असताना 48 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. दोन्ही मॉडेल्समध्ये केवळ वायरलेस चार्जिंग सपोर्टच नाही, तर 10 मिनिटांच्या क्विक चार्जिंगमध्ये 4 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक वेळ देखील मिळतो.