जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीचा खास प्लॅन, 365 दिवसांची चिंता मिटणार

कंपनीने आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक खास रिचार्ज प्लॅन सादर केलेले आहे. आज आपण अशाच एका खास प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत.

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीचा खास प्लॅन, 365 दिवसांची चिंता मिटणार
Jio plan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 6:54 PM

रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. सुमारे 48 कोटी लोक जिओचे सिमकार्ड वापरतात. कंपनीने आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक खास रिचार्ज प्लॅन सादर केलेले आहे. हे प्लॅन वेगवेगल्या वैधतेसह येतात. जिओकडे असे काही प्लॅन देखील आहेत जे पूर्ण वर्षभर म्हणजेच 365 दिवसांसाठी वैध आहेत. आज आपण अशाच एका खास प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत.

गेल्या काही काळापासून सर्वच टेलीकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता युजर्स जास्त काळ वैधता असलेल्या प्लॅनची निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे जिओने युजर्सची गरज लक्षात घेत दीर्घ वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅनची ​​संख्या वाढवली आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त एकदा रिचार्ज केल्यास संपूर्ण वर्षभर तुमची चिंता मिटू शकते.

जिओचा वार्षिक प्लॅन

जिओने अनेक रिचार्ज प्लॅन सादर केले आहे. सध्या जिओचा एक वार्षिक प्लॅन लोकप्रिय आहे. ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता मिळते, या प्लॅनची किंमत 3599 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सेवा देते. तसेच तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.

दररोज 2.5 जीबी डेटा

जे युजर्स जास्त डेटा वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खास आहे. या प्लॅनमध्ये 912 जीबी पेक्षा जास्त डेटा मिळते. तुम्ही दररोज 2.5 जीबी डेटा वापरू शकता. जिओचा हा रिचार्ज प्लॅन 5 जी डेटा ऑपरेटरसह येतो. त्यामुळे कंपनीच्या पात्र ग्राहकांना अमर्यादित 5 जी डेटा मिळतो.

ग्राहकांना हेही फायदे मिळणार

रिलायन्स जिओ कंपनी या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देते. तसेच कंपनी टीव्ही चॅनेलसाठी जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी जिओ एआय क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. त्यामुळे हा प्लॅन खुप लोकप्रिय झाला आहे.